Join us

Mobile Solar Pump : घरबसल्या मोबाईलवर सोलर पंप चालू-बंद करा, जाणून घ्या या फीचरबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 14:30 IST

Mobile Solar Pump : लाभार्थी शेतकरी या कंपन्यांची (Vendor List) निवड करून सोलर बसवून घेत असतात. आता या सोलरमध्ये काही फीचर अपडेट करण्यात येत आहेत.

Mobile Solar Pump : राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलर पंप या योजनेअंतर्गत (Solar Pump Yojana) शेतात सोलर पंप बसवले आहेत. अनेक शेतकरी या सोलर पंपाचा वापर शेतीसाठी करतही आहेत. त्यातच या सोलर पंपामध्ये अनेक नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहे. त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मोबाईलवर देखील सोलर (Solar Pump On Mobile) चालवता येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून सोलर वापरता येणार आहेत. 

मागेल त्याला सोलर पंप  (Magel Tyala solar Pump) योजनेअंतर्गत अनेक कंपन्या समाविष्ट आहेत. लाभार्थी शेतकरी या कंपन्यांची निवड करून सोलर बसवून घेत असतात. आता या कंपन्याच्या माध्यमातून सोलरमध्ये काही फीचर अपडेट करण्यात येत आहेत. त्यातील एक फिचर म्हणजे मोबाईलवरून सोलर चालवणे. एखाद्या दूरच्या शेतात जर आपण सोलर पंप लावला असला तरी ऑपरेट करता येणार आहे.

म्हणजेच घरबसल्या हा सोलर तुम्ही चालू बंद करू शकता. शिवाय जर सोलर ड्रिपवर असेल तर तुम्ही आहे, त्या ठिकाणाहून चालू बंद करू शकता. मागेल त्याला सोलर पंप योजनेमधील काही निवडक कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या फीचरमुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होणार आहे. 

मोबाईल अँपच्या मदतीने.... एका ॲपच्या माध्यमातून मोबाईल द्वारे सोलर पंप ऑपरेट करता येणार आहे यासाठी संबंधित ॲप मध्ये आपला रजिस्टर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा लागेल आणि यानंतरची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला मोबाईल द्वारे सोलर पंप वापरता येणार आहे. हे ॲप मध्ये मोटर ऑन ऑफ करण्यापासून ते इतरही पर्याय आपल्याला दिसून येतील

टॅग्स :कृषी योजनाशेती क्षेत्रशेती