Tur Kid Rog Niyantran : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान व अधूनमधून पाऊस होत आहे, अशा परिस्थितीत तूर पिकामध्ये कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे!
कोणत्या किडी व रोगांचा धोका?सध्याच्या वातावरणात कळी व फुलांच्या अवस्थेत हिरवी व शेंगा पोखरणारी अळी, पिसाळी पतंग (Pod Fly) आणि हेलिकोव्हर्पा अळी मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतात.
उपाययोजना :
किडींचे नियंत्रणशेतकऱ्यांनी पिकांचे नियमित निरीक्षण करावे.किडींचा प्रादुर्भाव दिसताच पहिली फवारणी करावी.निंबोळी अर्क (५%) किंवा अझाडिरॅक्टीन (३०० PPM) ५० मिली/प्रति १० लिटर पाणी किंवा अझाडिरॅक्टीन (१५०० PPM) २५ मिली/प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.किडींच्या नियंत्रणासाठी शेतात पक्षी थांबे (Bird Perches) उभे करावेत.
रोगांचे नियंत्रणतूर पिकामध्ये मर रोग (Wilting) आढळल्यास, रोगग्रस्त सुकलेली झाडे त्वरित नष्ट करावीत.पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साचल्यास, शेतात चर खोदून पाण्याचा निचरा करावा.रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा (८ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात) मिसळून आळवणी करावी.
- अधिक माहिती आणि मदतीसाठी कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली यांच्याशी संपर्क साधा.
Web Summary : Cloudy weather increases pest and disease risk in Tur. Control pests with neem oil or azadirachtin sprays and bird perches. Manage wilting by removing infected plants, improving drainage, and applying Trichoderma. Contact Krishi Vigyan Kendra, Hingoli for more assistance.
Web Summary : बादल वाले मौसम से तुअर में कीट और रोग का खतरा बढ़ गया है। नीम तेल या एजाडिरैक्टिन स्प्रे और बर्ड पर्च से कीटों को नियंत्रित करें। संक्रमित पौधों को हटाकर, जल निकासी में सुधार करके और ट्राइकोडर्मा लगाकर विल्टिंग का प्रबंधन करें। अधिक सहायता के लिए कृषि विज्ञान केंद्र, हिंगोली से संपर्क करें।