Join us

Tomato Fulgal : टोमॅटो पिकातील फुलगळ कशामुळे होते, उपाय काय करावे? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 21:18 IST

Tomato Fulgal : टोमॅटोची फुलगळ टाळण्यासाठी सर्व बाबींचे योग्य व्यवस्थापन व नियंत्रण करणे गरजेचे आहे.

Tomato Fulgal : टोमॅटो पिकातील फुलगळीची अनेक कारणे आहेत, ज्यात वातावरणातील बदल (जास्त तापमान, कमी आर्द्रता, कोरडे वारे), अन्नद्रव्यांची कमतरता, रसशोषक किडी आणि बुरशीजन्य रोगांचा समावेश होतो. यावर काय उपाय हे पाहुयात... 

फुलगळटोमॅटो पिकाची फुलगळ प्रामुख्याने जास्त तापमान, जास्त आर्द्रता, मंद प्रकाश, वेगवान व कोरडे वारे, पाण्याचा ताण, रोग व किडींचा प्रादुर्भाव तसेच पिकांमधील वाढ संप्रेरकांत होणारे अवांच्छित बदल इत्यादी कारणांमुळे होते. 

टोमॅटोची फुलगळ टाळण्यासाठी वरील सर्व बाबींचे योग्य व्यवस्थापन व नियंत्रण करणे गरजेचे आहे. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार एन.ए.ए. या वाढ संप्रेरकाच्या २० पीपीएम द्रावणाची फक्त फुलोऱ्यावर फवारणी करावी.

नाशिक जिल्ह्यासाठी हवामान अंदाज पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात दि. २३ ते २७ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २८-३० डिग्री सें. व किमान तापमान २२-२३ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग १५-२२ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :टोमॅटोपीक व्यवस्थापनशेती क्षेत्रशेती