Tomato Farming : सद्यस्थितीत काही भागात पाऊस सुरु आहे, काही ठिकाणी ढगाळ हवामान तर काही ठिकाणी दाट धुके पाहायला मिळत आहे. या मिश्र वातावरणामुळे अनेक विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अशावेळी नेमक्या काय उपाययोजना कराव्यात, हे समजून घेऊयात....
टोमॅटो विषाणूजन्य रोगांचे व्यवस्थापन
- लागवडीवेळी वाफ्यावर आच्छादनासाठी पांढरा, पिवळा, चंदेरी-काळा किंवा निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पेपरचा वापर करावा.
- विषाणूजन्य रोगांचा प्रसार काही तणे, फुलझाडांमार्फत होत असल्याने टोमॅटो पीक तसेच बांध तणविरहित व स्वच्छ ठेवावेत.
- रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे, फळे काढून जाळून नष्ट करावीत.
- पांढरी माशी, फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी प्रतिएकरी ४० ते ५० पिवळे व निळे चिकट सापळे वापरावेत.
- लागवडीनंतर दहा दिवसांनी कार्बोफ्युरॉन (३ सीजी) १३ किलो प्रतिएकरी झाडाभोवती गोलाकार पद्धतीने घालून झाकावे व पाणी द्यावे.
- पांढरी माशी, मावा, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी, डायमेथोएट (३० ईसी) २ मिली किंवा सायॲण्ट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मि.ली. किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मि.ली. अथवा निंबोळी अर्क ५% किंवा ॲझाडीरॅक्टिन (१५०० पीपीएम) ३ मिली किंवा व्हर्टीसिलीयम लेकॅनी ४ ग्रॅम किंवा मेटॅरायझीयम ॲनिसोप्ली ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून दहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
(नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज लक्षात घेता वरील सर्व कामे प्रसारित केलेल्या दिवसाकरिता स्थगित करव्यात.)
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी