Join us

Tomato crop Management : टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोग होऊ नये म्हणून काय कराल? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:05 IST

Tomato crop Management : टोमॅटो पिकावरील (Tomato Crop) विषाणूजन्य रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते..

Tomato crop Management :  टोमॅटो पिकावरील (Tomato Crop) विषाणूजन्य रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती असलेले वाण वापरासह तण नियंत्रणात ठेवणे, रसशोषक किडींवर नियंत्रण ठेवणे आणि रोगग्रस्त झाडे आणि फळे वेळीच नष्ट करणे, आदी कामे करावी लागतात. आणखी उपाययोजना करणे गरजेचे ठरते, ते पाहुयात... 

विषाणूजन्य रोगांचे लागवडीनंतरचे व्यवस्थापन

  • लागवडीवेळी वाफ्यावर आच्छादनासाठी पांढरा, पिवळा, चंदेरी-काळा किंवा निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पेपरचा वापर करावा.
  • विषाणूजन्य रोगांचा प्रसार काही तणे, फुलझाडांमार्फत होत असल्याने टोमॅटो पीक तसेच बांध तणविरहित व स्वच्छ ठेवावेत.
  • रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे, फळे काढून जाळून नष्ट करावीत.

 

जैविक नियंत्रण

  • फळधारणेनंतर जैविक कीडनाशकांचा वापर करावा.
  • टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, वांगी, गाजर, काकडी, खरबूज, कलिंगड, भुईमूग, बटाटा, उडीद, सोयाबीन, मूग, पपई, कापूस, भोपळा, केळी, बीट, पालक ही टोमॅटो पिकातील विषाणूजन्य रोगांची यजमान पिके आहेत. 
  • या पिकांत विषाणूजन्य रोगांची लागण झाली असल्यास, अशी रोगग्रस्त झाडे उपटून त्यांचा नायनाट करावा. 
  • टोमॅटोची शेवटची तोडणी होताच संपूर्ण पीक काढून नष्ट करावे. पीक तसेच काही दिवस राहिल्यास रोगाचा प्रसार
  • किडींद्वारे नव्या टोमॅटो पिकात होऊन प्रादुर्भाव वाढतो. 
  • (पावसाचा अंदाज लक्षात घेता स्वच्छ हवामान दरम्यानच सदरील कामे करावीत)

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी

टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापनतापमान