Join us

Spraying Protection : फवारणी करताना छोटी चूक, मोठं नुकसान करेल; वाचा सुरक्षिततेचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:04 IST

Spraying Protection : खरीप हंगामात तण व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांकडून कीटकनाशक आणि तणनाशक फवारणी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, योग्य काळजी न घेतल्यास विषबाधेचा धोका वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करताना सुरक्षेची योग्य खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कृषी विभागाने यासाठी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. (Spraying Protection)

Spraying Protection : खरीप हंगामात तण व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांकडून कीटकनाशक आणि तणनाशक फवारणी मोठ्या प्रमाणात केली जाते. (Spraying Protection)

मात्र, योग्य काळजी न घेतल्यास विषबाधेचा धोका वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करताना सुरक्षेची योग्य खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कृषी विभागाने यासाठी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.(Spraying Protection)

खरीप हंगामात पिके जोमाने वाढत असल्याने त्यावर तणनाशक व कीटकनाशक फवारणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. (Spraying Protection)

पावसामुळे तणांचा वाढलेला प्रादुर्भाव आणि ढगाळ वातावरणामुळे वाढलेल्या किडींचा सामना करण्यासाठी फवारणीला गती आली आहे. मात्र, फवारणीच्या वेळी योग्य ती काळजी न घेतल्यास विषबाधा होण्याचा धोका वाढतो.(Spraying Protection)

अलीकडेच कारंजा तालुक्यात अशाच प्रकारची दुर्घटना घडल्याने कृषी विभागाने सतर्कतेचे आवाहन केले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आरिफ शाह यांनी सांगितले की, फवारणी करताना योग्य तंत्रज्ञान, योग्य साहित्य व वैयक्तिक सुरक्षेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.(Spraying Protection)

फवारणी करताना घ्यावयाची काळजी 

* कीटकनाशकांचे मिश्रण नेहमी लाकडी काडीने नीट मिसळा.

* हातमोजे, रबरी बूट, मास्क व चष्मा वापरा.

* औषध अंगावर उडाल्यास लगेच साबण व पाण्याने धुवा.

* फवारणी दरम्यान नळी किंवा नॉझल अडकली तर ती तार किंवा टाचणीने स्वच्छ करा.

* फवारणीनंतर लगेच आंघोळ करा व कपडे धुवा.

* वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नका.

* डबे व बाटल्या स्वच्छ करून पिण्यासाठी पाण्यासाठी वापरू नका.

फवारणी करताना काय करू नये?

* उपाशीपोटी फवारणी करू नका.

* फवारणी करताना धूम्रपान करू नका व अन्नपदार्थ खाऊ नका.

*  वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी टाळा.

* औषधाचे उरलेले मिश्रण अथवा रिकामे डबे उघड्यावर टाकू नका.

विषबाधा झाल्यास काय कराल?

* तातडीने जवळच्या शासकीय दवाखान्यात जा.

* १०८ या टोल फ्री क्रमांकावर ॲम्ब्युलन्स मागवा.

* रुग्णाला शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडे पोहोचवा.

* रुग्णाच्या अंगावरील औषधाचे डाग, ओले कपडे तातडीने बदलून स्वच्छ पाण्याने धुवा.

डब्यावरील रंगी पट्ट्यांचा अर्थ ओळखा

किटकनाशक व तणनाशकांच्या डब्यांवर रंगीत पट्ट्या असतात.

त्या औषधाची तीव्रता दाखवतात

* लाल पट्टी – अत्यंत विषारी

* पिवळी पट्टी – मध्यम तीव्रता

* निळी पट्टी – कमी तीव्रता

* हिरवी पट्टी – सौम्य

महत्वाच्या बाबी

सततच्या पावसानंतर तण व किडींचा प्रादुर्भाव.

फवारणी करताना सुरक्षेची पूर्ण खबरदारी आवश्यक.

अपघात टाळण्यासाठी योग्य तंत्र आणि वैयक्तिक सुरक्षा साहित्य वापरा.

विषबाधा झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

कृषी विभागाचा सल्ला

खरीप हंगामात फवारणी टाळता येत नाही. मात्र, स्वतःच्या आणि पिकांच्या सुरक्षेसाठी योग्य दक्षता घ्या. फवारणी करताना सुरक्षेच्या साधनांचा वापर करा आणि शास्त्रीय मार्गदर्शनानुसारच औषध वापरा. - आरिफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

हे ही वाचा सविस्तर : Herbicide Spray: तण नियंत्रणाची योग्य वेळ; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीखतेखरीप