Join us
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंबावरील बुरशीजन्य स्कॅब, काळे ठिपके आणि फळ कुजवा नियंत्रणासाठी 'या' फवारण्या करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 20:35 IST

Dalimb Crop Management : या रोगांची लक्षणे काय आहेत, त्यावर उपाय काय करावा, हे समजून घेऊयात... 

Dalimb Crop Management : डाळिंबावरील बुरशीजन्य स्कॅब (Scab), काळे ठिपके (Anthracnose/Alternaria) आणि फळ कुजवा हे रोग प्रामुख्याने दमट हवामान आणि पावसाळ्यात उद्भवतात. या रोगांची लक्षणे काय आहेत, त्यावर उपाय काय करावा, हे समजून घेऊयात... 

  • डाळिंब पिकावर बुरशीजन्य स्कॅब, ठिपके आणि कुजवा यांसाठी काही आशादायक बुरशीनाशके जसे मॅण्डीप्रोपामीड, मेटीराम, प्रोपिकोनॅझोल, अॅझोक्सिस्ट्रॉबीन, ॲझोक्सिस्ट्रॉबिन + डायफेनोकोनॅझोल, क्लोरथैलोनिल मेटॅलॅक्झिल एम, बोर्डो मिश्रण ०.५ टक्के, कासुगामायसीन कॉपर ऑक्सिक्लोराइड, झायनेब हेक्झाकोनॅझोल, ट्रायसायक्लॅझोल + मॅन्कोझेब, क्लोरोथैलोनिल, फ्लूओपायरम + टेब्यूकोनॅझोल, टेब्यूकोनॅझोल ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबीन वरीलपैकी कोणत्याही बुरशीनाशकाच्या दोन ते तीन फवारण्या १० ते १४ दिवसांच्या अंतराने केल्यास चांगले परिणाम दिसून येतात. त्यामुळे पुढील अनेक फवारण्या टाळता येतात.
  • बोर्डो मिश्रणाव्यतिरिक्त प्रत्येक फवारणीत स्टीकर स्प्रेडर वापरावा.
  • एका हंगामात कॉपरयुक्त बुरशीनाशकाव्यतिरिक्त कोणतेही बुरशीनाशक दोनपेक्षा जास्त वेळा फवारू नये. 

(वरील बुरशीनाशकाची फवारणी आपल्या जवळील संशोधन केंद्र / कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञ यांचा सल्ला घेऊनच करावे.)

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

 

नोकरी सोडली तरी पीएफ काढू नका; होऊ शकते आर्थिक नुकसान, कधी काढायचे पैसे?

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pomegranate scab, black spot, fruit rot control: Spray these fungicides.

Web Summary : Control pomegranate diseases like scab and fruit rot with timely fungicide sprays. Use recommended fungicides like Mandipropamid and copper mixtures, consulting experts for advice. Rotate fungicides and use stickers for better results. Follow a 10-14 day interval between sprays.
टॅग्स :डाळिंबपीक व्यवस्थापनशेतीशेती क्षेत्र