Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंबा बागेवरील फुलकिडींच्या नियंत्रणासाठी 'ही' फवारणी फायद्याची, वाचा संपूर्ण माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 18:30 IST

सध्या कमाल आणि किमान तापमानात तफावत दिसत असून, ती फुलकिडींच्या (थ्रीप्स) वाढीसाठी पोषक आहे.

Agriculture News : सध्या कमाल आणि किमान तापमानात तफावत दिसत असून, ती फुलकिडींच्या (थ्रीप्स) वाढीसाठी पोषक आहे. या किडीचा आंबा मोहर आणि फळांवर प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. 

लक्षणे काय दिसतात? 

  • ही कीड कोवळ्या सालीचा भाग खरवडत असल्यामुळे तो भाग काळा पडतो, पाने वेडीवाकडी होतात व नंतर गळून पडतात. 
  • मोहराचे दांडे खरवडल्यासारखे दिसतात व मोहर काळा पडून गळून जातो. 
  • फळांवर प्रादुर्भाव झाल्यास फळाची साल खरवडल्यासारखी दिसते. 
  • फळांवर खाकी किंवा राखाडी रंगाचे चट्टे दिसून येतात. लहान फळांची गळ होते. 

 

फुलकिडींच्या नियंत्रणासाठीफुलकिडींच्या नियंत्रणासाठी, स्पिनोसॅड (४५ एससी) ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यास, दुसरी फवारणी ८ ते ९ दिवसांनी थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.२५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून घ्यावी.

भुरी रोग नियंत्रण

  • भुरी रोगामुळे मोहोरावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. बुरशीची मुळे अन्नरस शोषून घेतात. 
  • त्यामुळे मोहोर वाळून गळून जातो. लहान फळांच्या देठांवर ही बुरशीची वाढ होऊन फळे गळतात.
  • करपा रोगामुळे मोहोर तांबूस होऊन वाळतो. तसेच फूलगळ होते. लहान फळांवर काळे डाग पडून फळांची गळ होते.
  • करपा आणि भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, अॅझाक्सिस्ट्रॉबिन (२३ एससी) १ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

 

Stamp Duty : मुद्रांक शुल्क म्हणजे काय, तो कोणत्या कागदपत्रांवर लागतो, ते का भरावे लागते?

English
हिंदी सारांश
Web Title : Effective Spray for Thrips Control on Mango Orchards: Full Information

Web Summary : Temperature differences favor thrips growth, damaging mango blossoms and fruits. Control them with Spinosad, followed by Thiamethoxam if needed. For powdery mildew and anthracnose, use Azoxystrobin. Follow recommendations from Krishi Mausam Seva, Igatpuri.
टॅग्स :आंबापीक व्यवस्थापनशेती क्षेत्रशेती