Join us

Soyabean Sathavnuk : सोयाबीन साठवणुकीवेळी 'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 19:30 IST

Soyabean Sathavnuk : अशा परिस्थितीत सोयाबीनची योग्य प्रकारे साठवणूक (Soyabean Sathavnuk) कशी करावी हे जाणून घेऊया.

Soyabean Sathavnuk : सध्या सोयाबीनचे अपेक्षित बाजारभाव  (Soyabean Market) मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी सोयाबीन साठवण्यावर भर देत आहेत. मात्र सोयाबीनची साठवणूक करताना देखील विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. साठवताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. सोयाबीन (Soyabean Market) हे अत्यंत कच्चे उत्पादन आहे. जर त्यात जास्त ओलावा असेल किंवा दाणे जास्त कोरडे असतील तर दोन्ही परिस्थितींमध्ये धोका आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनची योग्य प्रकारे साठवणूक (Soyabean Sathavnuk) कशी करावी हे जाणून घेऊया.

आर्द्रता तपासाकाढणीच्या वेळी सोयाबीनची आर्द्रता 13 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास सर्वप्रथम ती ओलावा कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. ओलावा कमी करण्यासाठी सर्वप्रथम उन्हात वाळवू शकता. लक्षात ठेवा की ओलावा कमी केल्याशिवाय सोयाबीनची साठवणूक करू नका. कारण ते खराब होण्याची शक्यता असते. 

कोरडी जागा आवश्यकसोयाबीन कोरड्या आणि किंचित थंड ठिकाणी साठवणूक करावी. कोरड्या जागेमुळे, उत्पादनास बुरशीजन्य रोगाचा त्रास होणार नाही. हलक्या थंडीमुळे सोयाबीनच्या दाण्यातील उष्णता वाढणार नाही. यामुळे धान्य खराब होण्यापासून बचाव होईल. तापमानावर लक्ष ठेवा. जर ते वाढले किंवा हवेतील आर्द्रता वाढली तर उत्पादन बाहेर काढा. 

कीटक आणि रोगांवर लक्ष ठेवासोयाबीन साठवण्यापूर्वी किंवा नंतर त्यावर हल्ला करणाऱ्या कीटकांवर लक्ष ठेवा. यामुळे उत्पादनाचे सर्वाधिक नुकसान होते. उत्पादनात कोणत्याही प्रकारचे कीड दिसल्यास तात्काळ उपाययोजना करा. अन्यथा साठवलेले सर्व धान्य खराब होऊ शकते. तसेच साठवलेल्या सोयाबीनवर लक्ष ठेवा. 

हाताळणीत सावधगिरी बाळगासोयाबीन हाताळताना खूप काळजी घ्यावी लागते. उत्पादनाची साठवणूक करण्यापूर्वी अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जर तुम्ही सोयाबीन गोण्यांमध्ये भरून ठेवत असाल त्या ठिकाणची जागा कोरडी करा. सोयाबीनची गोणी अचानक फोडू नका, कारण त्यामुळे दाणे फुटतात. त्यामुळे नुकसान वाढण्याची शक्यता वाढते.

जास्त सुकवू नका, कारण... सोयाबीन साठवून ठेवण्यापूर्वी जर तुम्ही ग्रेन ड्रायरने वाळवत असाल तर खबरदारी घ्यावी लागेल. उत्पादन जास्त सुकवू नका कारण, त्यामुळे दाणे फुटू शकतात. जास्त कोरडे केल्याने देखील धान्य आकुंचन पावते. जर तुम्हाला नैसर्गिक हवेने सोयाबीन सुकवायचे असेल तर सच्छिद्र असलेली जागा वापरा. जेणेकरून हवा सहज येऊ जाऊ शकेल. ही हवा सोयाबीनला सुकवण्याव्यतिरिक्त, निरोगी आणि ताजी ठेवण्यास मदत करेल.

टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रमार्केट यार्डशेती