Join us

सोयाबीन पेरणी किती तारखेपर्यंत करू शकतो अन् कशी करावी? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 14:58 IST

Soyabean Perani : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात समाधानकारक पाऊस (Heavy Rain) झाला आहे. त्यामुळे सोयाबीन पेरणीला वेग आला आहे.

Soyabean Perani : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात समाधानकारक पाऊस (Heavy Rain) झाला आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेता वापशावर (६५ ते १०० मी.मी. पाऊस) बीजप्रक्रिया करून सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. कारण पेरणी (Soyabean Perani) जसजशी उशिरा होत जाईल, त्यप्रमाणे उत्पादनात मोठी घट होते. 

पेरणीचे अंतर दोन ओळीत ४५ सें.मी. व दोन रोपातील अंतर ५ सें.मी. अशा प्रकारे करावे. पेरणी करताना बियाणे ४ सें. मी. पेक्षा खोल पडणार नाही, याची काळजी घ्यावी. तज्ञांच्या मतानुसार साधारण १५ जुलैपर्यंत पेरणी करून घ्यावी. अधिकचा उशीर होणार नाही याची काळजी घ्यावी. 

आंतरपीक पद्धतीमध्यम ते भारी जमिनीत सोयाबीन आणि तूर या पिकांच्या ओळींचे प्रमाण ३:१ किंवा ४:२ असे ठेवावे. उशिरा पेरणीसाठी सुद्धा ही पद्धत उपयुक्त व फायदेशीर आहे. सर्वसाधारणपणे या आंतरपीक पद्धतीपासून निव्वळ तुरीच्या तुलनेत प्रति एकर अधिक उत्पन्न मिळते.

या गोष्टीही लक्षात असू द्या पेरणीच्या वेळी जमिनीमध्ये ओलावा (moisture) असावा.एका एकरासाठी साधारणपणे ३० ते ४० किलो बियाणे पुरेसे असते.सोयाबीनचे बियाणे जास्त खोलवर पेरू नये, ज्यामुळे उगवण चांगली होईल.पेरणीनंतर तणांचे नियंत्रण करणे आवश्यक आहे.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रपीक व्यवस्थापनशेती