Join us

Soyabean Farming : पेरणीपूर्वी सोयाबीनवर बीजप्रक्रिया करा अन् खोडमाशीला रोखा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 12:04 IST

Soyabean Farming : या किडीचा प्रादुर्भाव पिकाचे रोपावस्थेपासुनच म्हणजेच रोप १० ते १५ दिवसाचे झाल्यानंतर होतो.

Soyabean Farming : विदर्भात सोयाबिन पिकाची (Soyabean Crop) मोठ्या प्रमाणावर लागवड होते. पेरणीनंतर प्रामुख्याने खोड माशीचा रोपावस्थेत प्रादुर्भाव होत असल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासुनव या किडीच्या व्यवस्थापणासाठी बिज प्रक्रिया करूनव लागवड करावी. 

या किडीचा प्रादुर्भाव पिकाचे रोपावस्थेपासुनच म्हणजेच रोप १० ते १५ दिवसाचे झाल्यानंतर होतो. त्यामुळे त्याचा संख्येवर विपरीत परिणाम होऊन पिकाची दुबार पेरणीची शक्यता असते. मात्र बिजप्रक्रिया केल्यास सोयाबीनचे (Soyabean crop) पिक जवळपास २५ ते ३० दिवसपर्यंत या किडीस कमी प्रमाणात बळी पडते.

किडीचा जिवनक्रम व नुकसानीचा प्रकार

  • खोड माशी लहान, चमकदार काळया रंगाची असुन त्यांची लांबी २ मि.मि. असते. 
  • अंडयातुन निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळ्या रंगाची, २-४ मि.मि. लांब असते. 
  • ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. 
  • अळीनंतर पानाचे देठातुन झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करुन आतील भाग पोखरुन खाते. 
  • प्रादूर्भावग्रस्त खोड चिरून पाहील्यास परिक्या रंगाची अळी किंवा कोषला लसर नागमोडी भागात दिसते. 
  • खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरुवातीचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते. 
  • मोठ्या रोपावर असा परिणाम दिसत नाही, परंतु अशा रोपावर खोडमाशीचे अळीचे प्रौढमाशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते. 
  • खोडमाशीची डाळी तसेचकोष फांद्यात, खोडात असतो. 
  • अशा किङग्रास्त रोपावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वनज कमी होऊन उत्पादनात १६-३० टक्के घट होते.

 

असे करा व्यवस्थापन 

१. थायोमेथोक्झाम ३० टक्के एफ एस १० मिली / १ कि बियाणे बिजप्रबिक्रीया करूनच पेरणी करावी. त्यामुळे सुरुवातीच्या २५ ते ३० दिवस सोयबीन पिक खोड माशी या किडीच्या प्रादुर्भावापासुन मुक्त राहते.२. बिज प्रक्रिया करतांना सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बिज प्रक्रिया करावी. त्यानंतर रासायनिक किटकनाशकाची व सर्वात शेवटी जैविक बुरशीनाशक व जैविक संर्वधकाची बिज प्रक्रिया करावी.३. सोयाबीन पिकामधे उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर पिवळे चिकट सापळे लावून नियमित खोडमाशीच्या प्रादुर्भावर लक्ष ठेवावे (२५/हे.).४. ज्या ठिकाणी काही कारणा अभावी सोयाबीन बियाण्यास थायोमेथोक्झामची बिजप्रक्रिया केली नसल्यास सोयाबीनचे पिक १५ दिवसाचे झाल्यानंतर इथियॉन ५० टक्के ३० मिली किंवा इंडोक्राकार्य १५.८ टक्के ७.५ मिली किंवा क्लोरेंट्रेभिप्रोल १८.५ टक्के ३.० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

या किडीच्या वाढीसाठी उष्म तपमान जास्त आर्द्धता, भारीपाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण पोषक आहे. असे वातावरण आढळल्सास शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबिन पिको नियमित सर्वेक्षण करून सतर्क राहून नियंत्रणाचे उपाय योजावेत.

- डॉ. डी. बी. उंदिरवाडे, विभाग प्रमुख किटकशास्त्र विभाग, पंदेकृवि, अकोला

टॅग्स :सोयाबीनपीक व्यवस्थापनशेती क्षेत्रशेतीखरीप