राजगिरा हे केवळ उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी नसून ते एक अत्यंत पौष्टिक तृणधान्य आहे. राजगिऱ्यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि लोह (Iron) यांचा खूप चांगला साठा असतो. यामुळे आहारात पौष्टिकतेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुपोषण कमी करण्यासाठी हे पीक अत्यंत उपयुक्त ठरते. (Rajgira Tea)
राजगिऱ्याच्या पानांपासून आणि फुलांपासून तयार होणारा नैसर्गिक, कॅफीन-मुक्त चहा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरतो. (Rajgira Tea)
जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेला हा चहा पचन सुधारणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. (Rajgira Tea)
घरच्या घरी सोपी पद्धत वापरून हा गुलाबी, सुगंधी आणि नैसर्गिक चहा सहज तयार करता येतो.(Rajgira Tea)
राजगिरा: शास्त्रीय माहिती आणि महत्त्व
शास्त्रीय नाव: Amaranthus spp.
कुळ: Amaranthaceae
महत्त्व : राजगिऱ्यामध्ये प्रथिने (Protein), फायबर, कॅल्शियम आणि लोहाचा (Iron) खूप चांगला साठा असतो, ज्यामुळे कुपोषण कमी करण्यास आणि आहारात पौष्टिक सुधारणा करण्यास मदत होते.
वैशिष्ट्ये : राजगिऱ्याच्या पानांपासून बनवलेला काळा आणि हिरवा चहा 'कॅफीन-मुक्त' (Caffeine-free) असतो आणि त्याचे उपचारात्मक फायदे आहेत.
रंगीत जातींमधील लाल आणि पिवळा रंग नैसर्गिक अन्न पूरक म्हणून वापरला जाऊ शकतो.
पौष्टिक मूल्य (प्रति १०० ग्रॅम)
राजगिऱ्यामध्ये खालीलप्रमाणे पौष्टिक घटक आढळतात:
उर्जा (Energy): २३ Kcal
प्रथिने (Protein): २.४६g
फायबर (Dietary Fiber): २.२g
जीवनसत्त्वे (Vitamins): व्हिटॅमिन ए (२९१७ IU), व्हिटॅमिन सी (४३.३ mg), व्हिटॅमिन के (११४० mg).
खनिजे (Minerals): कॅल्शियम (२१५ mg), लोह (२.३२ mg), पोटॅशियम (६११ mg), मॅग्नेशियम (५५ mg).
चहा बनवण्याच्या विविध पद्धती
राजगिऱ्याचा चहा प्रामुख्याने पानांपासून, फुलांपासून किंवा त्यांच्या पावडरपासून बनवला जातो.
राजगिऱ्याच्या पानांचा चहा (हर्बल इन्फ्युजन)
वापर : यासाठी Amaranthus caudatus किंवा इतर हिरव्या पालेभाज्यांच्या जातींची ताजी किंवा वाळलेली पाने वापरतात.
साहित्य : पाणी, राजगिऱ्याची पाने, मध, गूळ किंवा लिंबू.
कृती:
पाणी उकळून घ्या.
एका कप गरम पाण्यात १ ते ४ ताजी पाने किंवा वाळलेली पाने ५ मिनिटे भिजू द्या.
चहा गाळून घ्या किंवा तसाच प्या.
चवीसाठी मध, गूळ किंवा १-३ थेंब लिंबाचा रस घालू शकता.
फ्लॉवर टी (फुलांचा चहा)
वापर : हा चहा त्याच्या आकर्षक रंगासाठी आणि सौम्य चवीसाठी ओळखला जातो. यासाठी 'वडामल्ली' किंवा 'हजार दिवस लाल' म्हणून ओळखली जाणारी वाळलेली फुले वापरतात.
साहित्य : ३-५ वाळलेली फुले (किंवा १ लिटर पाण्यासाठी २ चमचे फुले), गरम पाणी (८५-१०० अंश सेल्सिअस).
कृती :
पाणी गरम करून घ्या.
फुले गरम पाण्यात ४ ते ६ मिनिटे भिजत ठेवा (कडू चव टाळण्यासाठी कमी वेळ भिजवण्याची शिफारस केली जाते).
पाण्याचा रंग आकर्षक गुलाबी होतो.
चहा गाळून घ्या आणि आवडीनुसार गोड करा.
पावडरपासून चहा बनवण्याची पद्धत
पावडर तयार करणे : पाने किंवा फुले ६०-६५ अंश सेल्सिअस तापमानावर किंवा उन्हात वाळवून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवा.
चहाची कृती:
एक कप उकळत्या पाण्यात अर्धा ते एक चमचा पावडर टाका.
त्यात मध किंवा गूळ मिसळा.
गाळून घ्या किंवा तसाच प्या.
राजगिरा चहाचे आरोग्यदायी फायदे
भरपूर अँटी ऑक्सिडंट्स : शरीरातील पेशींचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.
पचनास मदत : पचनसंस्था सुधारते आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
मानसिक लक्ष : लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.
सूज कमी करणे : राजगिऱ्यातील दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे जुनाट सुजेचा धोका कमी होतो.
हाडांचे आरोग्य : कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसमुळे हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिस टाळण्यास मदत होते.
रोगप्रतिकार शक्ती : व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संक्रमणाशी लढण्यास मदत होते.
- प्रा. अंकिता सं. काळे (माजी सहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, उदगीर)
- डॉ. अंगद प्र. गरडे (सहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर)
Web Summary : Amaranth tea, caffeine-free and rich in nutrients, offers various health benefits. It's prepared from leaves, flowers, or powder, aiding digestion, boosting immunity, and strengthening bones. Recipes included.
Web Summary : राजगिरे की चाय, कैफीन-मुक्त और पोषक तत्वों से भरपूर, कई स्वास्थ्य लाभ प्रदान करती है। यह पत्तियों, फूलों या पाउडर से बनाई जाती है, जो पाचन में सहायता करती है, प्रतिरक्षा प्रणाली को बढ़ाती है और हड्डियों को मजबूत करती है। बनाने की विधि शामिल है।