Join us

Rabbi Pik Vima : आता रब्बी पीकविमासाठी घरबसल्या मोबाईलवरून अर्ज करा, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 15:40 IST

Rabbi Pik Vima : रब्बी हंगाम पीकविमा (Rabbi Pik Vima) अर्ज तुमच्या मोबाइलवरूनही करू शकतात.

Rabbi Pik Vima : रब्बी हंगाम पीकविमा (Rabbi Pik Vima) भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. शासनाच्या PMFBY या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सीएससी किंवा फार्मर कॉर्नर या दोन माध्यमातून अर्ज करू शकतात. तसेच तुम्ही तुमच्या मोबाइलवरूनही पीकविमा अर्ज करू शकतात. यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल (Apply Rabbi crop Insurance From Mobile) असणे आवश्यक आहे. तर जाणून घेऊया, घरबसल्या मोबाईल वरून पीकविमा अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया.... 

मोबाईलवरून अर्ज कसा करावा.. 

  • सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर PMFBY Crop insurance नावाचे अँप डाऊनलोड करायचे आहे. 
  • हे अँप डाउनलोड केल्यानंतर सर्वप्रथम मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचे आहे. मोबाईल नंबर आलेला ओटीपी टाकल्यानंतर लॉग इन होईल. 
  • पहिली विंडो ओपन होईल, यात PMFBY insurance नावाच्या पर्यायावर क्लिक करायचं आहे. 
  • यानंतर सर्वात प्रथम राज्य, हंगाम, योजेनचे नाव, योजनेचे वर्ष निवडायचे आहे. 
  • वरील पर्याय निवडल्यांनंतर सेव्ह आणि सबमिटवर क्लिक करायच आहे. 
  • यानंतर बँकेचे डिटेल्स व्यवस्थित भरायचे आहेत. जसे की, बँकेचे नाव, खाते नंबर इत्यादी. 
  • यानंतर शेतकऱ्याची माहिती आधार कार्डवर असलेल्या नावाप्रमाणे भरायची आहे. यात नाव, पत्ता इत्यादी. 
  • पुढच्या विंडोमध्ये जिल्हा, तालुका, तहसील, गाव माहिती भरायची आहे. 
  • यानंतर पिकाची माहिती भरायची आहे. जसे की, पिकाचे नाव, लागवड तारीख, सर्व्हे नंबर, खाते नंबर, मालकी हक्क इत्यादी. 
  • हे सर्व भरल्यानंतर जर तुम्ही या आधी पीक विमा भरला असेल तर पूर्वीची माहिती दाखवली जाईल. ती व्यवस्थित बघून घ्यायची आहे. 
  • यांनतर कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. जसे की, आधारकार्ड, सातबारा, बँकेचे पासबुक आणि पीक पेरा प्रमाणपत्र. 
  • यानंतर पुढील विंडोमध्ये थेट पेमेंट करण्याचा पर्याय येईल. आपण ऑनलाईन पेमेंट करू शकता. 
  • पेमेंट केल्यानंतर पुढील विंडोमध्ये संपूर्ण माहिती भरल्याची पावती दिसेल. ती तुम्हाला डाऊनलोड करता येईल. 

 

हेही वाचा : Rabbi Crop Insurance Application Form : रब्बी पिक विमा अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सोप्या शब्दांत

टॅग्स :पीक विमाशेती क्षेत्रशेतीकृषी योजना