Join us

डाळिंब बागेवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालाय, असे करा नियंत्रण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:25 IST

Agriculture News : डाळिंब फळपिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. या किडींचे नियंत्रण कसे करावे? 

Agriculture News :  डाळिंब (Pomegranate) या फळपिकावर येणाऱ्या विविध किडी आणि रोगांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन (Integrated Pest Management) पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. या किडींचे नियंत्रण कसे करावे? 

एकरी २४ नीळे व पिवळे चिकट सापळे बागेत नागमोडी पद्धतीने झाडाच्या उंचीच्या १५ सें. मी खाली लावावेत. पहिली फवारणी - रसशोषक किडींसाठी, अॅझाडिरेक्टिन (१०,००० पीपीएम) ३ मिली किंवा करंज तेल ३ मि.ली किंवा वरील दोन्ही एकत्रितपणे प्रत्येकी ३ मि.ली. अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मि.ली प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. (पावसाची उघडीप असताना फवारणी करावी)

दुसरी फवारणी - ७ ते १० दिवसांनी रसशोषक किडींसाठी, सायअँट्रानीलीप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मि.ली. किवा थायमिथोक्साम (२५ डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मि.ली. प्रतिलिटर पाणी प्रमाणे करावी.

फुलधारणा अवस्थारसशोषक किडींसाठी, स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.४ मि.ली. किवा स्पिनोसॅड (४५ एससी) ०.३ मि.ली. अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ २५ मिली मिली प्रतिलिटर प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारावे. (पावसाची उघडीप असताना फवारणी रणी करावी)

फळधारणा अवस्थारसशोषक कीड व फळ पोखरणाऱ्या अळीसाठी, साय अँट्रानीलीप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मि.ली. किंवा क्लोर अँटानीलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.ली. किंवा टोल्फेनपायरेंड (१५ ईसी) २ मि.ली. किंवा फ्लोनिकामीड (५० डब्ल्यूर्जी) ०.४ ग्रॅम अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मिली प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :डाळिंबशेती क्षेत्रपीक व्यवस्थापनशेती