Join us

Pesticide Subsidy : पीकसंरक्षणासाठी सरकारची मोठी मदत; आजच करा अर्ज वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:54 IST

Pesticide Subsidy : कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय पोषण व अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सूक्ष्म कीटकनाशक, बुरशीनाशक आणि अन्नद्रव्य (Crop Protection) खरेदीसाठी प्रति हेक्टर २,५०० रु. किंवा ५०% अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन अधिक नफा मिळण्याची संधी वाढणार आहे. (Pesticide Subsidy)

Pesticide Subsidy :  शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने मोठी आनंदवार्ता दिली आहे. राष्ट्रीय पोषण व अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना सूक्ष्म कीटकनाशक, बुरशीनाशक आणि सूक्ष्म (Crop Protection) अन्नद्रव्य खरेदीसाठी प्रति हेक्टर २,५०० रुपये किंवा ५०% पर्यंत अनुदान मिळणार आहे. (Pesticide Subsidy)

हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल.(Pesticide Subsidy)

अनुदान कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार?

ही योजना एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन (IPM) आणि एकात्मिक खत व्यवस्थापन (INM) यांच्या अंतर्गत राबवली जाणार आहे. या अंतर्गत, शेतकऱ्यांना एका हेक्टरसाठी २,५०० रुपये किंवा ५०% (जे कमी असेल तेवढे) अनुदान दिले जाईल.

योजनेचे उद्दिष्ट

पिकांवरील कीड व रोग नियंत्रणासाठी आर्थिक मदत

उत्पादन खर्चात बचत

अधिक दर्जेदार आणि निरोगी पीक उत्पादन

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे

अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

७/१२ उतारा (पीक पेरणीची नोंद असलेला)

जीएसटी असलेले खरेदी बिल

आधार कार्डची झेरॉक्स

राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स

अर्ज कोठे करावा?

शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा. अर्ज करताना पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा आणि खरेदीची बिलं वेळेत सादर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कृषी विभागाचे आवाहन

ही योजना शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून अधिक फायदेशीर शेती करण्याची संधी देणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ही संधी वाया घालवू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ही योजना राबवण्यामागील मुख्य हेतू म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकांना कीड आणि रोगांपासून संरक्षण देऊन उत्पादन वाढवणे व खर्च कमी करणे. योग्य वेळी अर्ज करून शेतकरी आपला फायदा दुप्पट करू शकतात.

हे ही वाचा सविस्तर : Spraying Protection : फवारणी करताना छोटी चूक, मोठं नुकसान करेल; वाचा सुरक्षिततेचे उपाय

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीकखते