Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या थंडीत कांदा, गहू, हरभरा पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन सल्ला, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:10 IST

Agriculture News : रब्बी हंगामातील कांदा, गहू व हरभरा या पिकांवर विविध कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा, सटाणा, येवला व नांदगाव भागातील परिसरामध्ये वाढत्या थंडी, धुके व ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातीलकांदा, गहू व हरभरा या पिकांवर विविध कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. सोबत अति थंडीमुळे वाढ सुद्धा खुंटलेली दिसत आहे. यासाठी शेतकरी बांधवानी पुढील उपाय योजना कराव्यात.

कांदा पिकासाठी -

  • थंडीत पडणाऱ्या दवामळे करपा रोग (Purple Blotch) मोठ्या प्रमाणावर वाढतो. 
  • नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी / हारझियानम जैविक बुरशीनाशक १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. 
  • मातीमध्ये २.५ किलो/एकर ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावे.
  • करपा रोगाचा अधिक प्रादुर्भाव दिसताच डायफेनोकोनाझोल २५% EC १ मि.ली. लिटर किंवा अॅझोक्सीस्ट्रोबीन टेबुकोनाझोल १ ग्रॅम/लिटर प्रमाण घेऊन ८ ते १० दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी.
  • फुल किडीच्या नियंत्रणासाठी नीम तेल १०००० पीपीएम १ मि.ली. लिटर किंवा फिप्रोनील ५% SC १ मि.ली. / लिटर प्रमाण घेऊन फवारणी करावी.

गहू पिकासाठी - मावा किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% SL ०.३ मि.ली./लिटर किंवा थायमेथॉक्साम २५% WG ०.२५ ग्रॅम/लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. 

हरभरा पिकासाठी -फुले येण्याची अवस्था असताना ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली / लिटर व घाटे लागताना इमामेक्टिन बेंझोएट ५ % SG ०.४ ग्रॅम /लिटर पाणी किंवा इंडॉक्साकार्ब १४.५% SC १ मि.ली. / लिटर किंवा क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल १८.५% SC ०.३ मि.ली. / लिटर किंवा स्पायनोसॅड ४५% SC ०.३ मि.ली. / लिटर प्रमाण घेऊन एका कीड नाशकाची फवारणी करावी

थंडीमध्ये सर्वसाधारण विशेष काळजी (सर्व पिकांसाठी) -दव असताना फवारणी टाळा; दुपारी ११ ते ४ या वेळेत करा.हलके पण वारंवार पाणी टाळा यामुळे बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढते वाफसा आल्यावरच पाणी द्यावे.अतिरिक्त नत्राचा वापर टाळावा यामुळे मावा/फुलकिड व बुरशीजन्य रोग वाढतात व सोबत पालाश पुरेसा द्यावा.

- विशाल जी चौधरी विषय, विशेषज्ञ (पिक संरक्षण) कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव (नाशिक) 

 

Read More : सेंद्रिय भाजीचे अनेक फायदे, खरा सेंद्रिय भाजीपाला ओळखायचा कसा, वाचा सविस्तर 

English
हिंदी सारांश
Web Title : Managing pests and diseases in winter crops: Onion, wheat, chickpea advisory.

Web Summary : Due to cold weather, farmers in Nashik are advised on managing pests and diseases in onion, wheat, and chickpea crops. Specific fungicide and insecticide recommendations are given for each crop to prevent yield loss and stunted growth. General precautions for all crops during cold weather are also provided.
टॅग्स :रब्बी हंगामगहूकांदाशेती क्षेत्रशेती