Join us

Seed Buying : दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे का? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 20:15 IST

Seed Buying : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी आता बाजारातून नवे बियाणे खरेदी (Biyane kharedi) करण्यावर भर देतात.

Biyane Kharedi : खरीप हंगाम (Kharif Season) काही दिवसांवर आला असून शेतकरी नांगरणीच्या कामात व्यस्त आहेत. शेतकऱ्यांचे पहिले काम म्हणजे बियाणे खरेदी (Biyane kharedi) होय. अशावेळी बियाणे खरेदी करताना मोठी काळजी घ्यावी. कारण अनेकदा बियाणे सदोष निघल्याने उत्पादनावर परिणाम होतो.  

अनेक शेतकरी बांधवांचा समज असतो की प्रत्येक वर्षी नवीन बियाणे बाजारातून (Biyane Kharedi) विकत घेऊनच पेरणी करावी. मात्र, सोयाबीन, मूग, उडीद, गहू, चवळी, भुईमूग यांसारखी पिकं स्वपरागसिंचीत (self-pollinated) असल्यामुळे त्यामध्ये संकरीत वाणांचा प्रश्न नसतो. 

त्यामुळे एकदा प्रमाणित बियाणे विकत घेतल्यावर त्यापासून तयार झालेल्या पिकाचे बियाणे पुढील दोन वर्षे वापरता येते. यामुळे दरवर्षी नवीन बियाण्यावर होणारा अनावश्यक खर्च टाळता येतो. पण हे बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता (germination capacity) तपासणे अत्यावश्यक असते.

बाजारातील बियाण्यांवर अवलंबून राहणे का धोकादायक ठरते?

कधीकधी विकत घेतलेले बियाणे उगवत नाही. अशावेळी शेतकरी बांधवांनी खते, मेहनत, वेळ आणि पैसा खर्च केलेला असतो. पेरणी कालावधीही निघून जातो. नंतर लेखी तक्रार, पंचनामे, नुकसानभरपाईसाठी प्रयत्न यामुळे मानसिक व आर्थिक त्रास होतो. यावर उपाय म्हणजे— बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करणे. ही तपासणी आपण घरी सहज करू शकतो.

Seed Germination Test : 'या' तीन सोप्या पद्धतींनी घरच्या घरी करा उगवणक्षमता तपासणी

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीखरीप