Join us

Job Card : घरबसल्या दोन मिनिटात जॉब कार्ड कसे काढायचे? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 12:47 IST

Job Card : जर तुम्हालाही घरकुल योजनेसाठी फॉर्म भरायचा असल्यास जॉब कार्ड आवश्यक असते.

Mnrega Job Card : सध्या महाराष्ट्रातील बहुतांश गावामध्ये घरकुल योजनेतून (Gharkul Yojana) घरे बांधण्याची कामे सुरु आहेत. शिवाय पंतप्रधान घरकुल योजनेसाठी (PM Awas Yojana) दुसरा टप्पा देखील सुरु झाला आहे. जर तुम्हालाही घरकुल योजनेसाठी फॉर्म भरायचा असल्यास जॉब कार्ड आवश्यक असते. ते जॉब कार्ड (How To Get Job card) कसे काढायचे? हे आजच्या भागातून जाणून घेऊयात... 

सर्वप्रथम जॉब कार्ड (Job Card) काढण्यासाठी, तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल आणि तेथे अर्ज करावा लागेल. अर्ज भरताना तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आणि माहिती द्यावी लागेल. या ठिकाणी आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो आणि जॉब कार्डचा फॉर्म लागेल. या जॉब कार्डवरील माहिती भरल्यानंतर ग्रामरोजगार सेवकाकडे (MNREGA) हा फॉर्म जमा करावा. यानंतर काही दिवसांनी जॉब कार्डचा नंबर दिला जातो. 

जॉब कार्डचा नंबर मिळाल्यांनतर ते डाऊनलोड कसे करायचे, ते पाहूया.... 

  • सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या narega या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. 
  • या ठिकाणी Generate Reports या पर्यायावर क्लिक करा. 
  • यानंतर दिलेल्या राज्यांपैकी आपले राज्य निवडा. (उदा. महाराष्ट्र)
  • पुढील व्हिडिओमध्ये काही पर्याय दिले असतील. जसे वर्ष, तालुका, ब्लॉक, पंचायत. 
  • ही सर्व माहिती भरल्यानंतर Proceed या पर्यायावर क्लिक करा. 
  • यानंतर एक नवीन पेज उघडेल, यात अनेक पर्याय दिसतील. यातील R1 जॉब रजिस्ट्रेशन (R1 job registration) या कॉलम मध्ये जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर (Job card/employment register) यावर क्लिक करा.
  • त्यात तुमच्या गावातील जॉब कार्ड बनवलेल्या व्यक्तींची नावे आणि त्यांचे जॉब कार्ड नंबर दिसेल. 
  • त्यात तुमचे नाव शोधा. तुमच्या नावासमोर तुमचा जॉब कार्ड नंबर दिसेल. तो तुम्ही सुरक्षितपणे लिहून ठेवा.
  • तसेच ते कार्डही डाउनलोड करता येईल. 
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीकेंद्र सरकार