Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमी खर्चात दररोजचा नफा देणारा मिनी बेसन मिलचा व्यवसाय, पहा व्यवसायाबद्दलची संपूर्ण माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 20:35 IST

Mini Besan Mil Business : बेसनाचे भरपूर प्रमाणात वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात, हे बेसन हे मिलवर तयार केले जाते. 

Mini Besan Mil Business :    भारतातील प्रमुख कडधान्यांपैकी हरभरा हे शेतकऱ्यांचे अत्यंत महत्त्वाचे पीक असून, हरभऱ्यापासून प्रामुख्याने डाळ आणि बेसन तयार केले जाते. बेसनाचे भरपूर प्रमाणात वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ बाजारात मिळतात. हे सर्व पदार्थ बनविण्यासाठी लागणारे बेसन हे मोठ्या मिलवर तयार करतात. 

तुम्हालाही जर कमी गुंतवणुकीत बेसन मिलचा व्यवसाय करायचा असेल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा. 

मिल मशीनची प्रमुख वैशिष्ट्येउत्पादन क्षमता ५० किलो बेसन प्रति तासउतारा (मिलिंग आउटपुट) : सुमारे ९८ टक्के

प्रमुख घटकपल्व्हरायझर : डाळीचे पिठात रूपांतर करतेअस्पिरेटर : पिठातील सूक्ष्म धूळ व तुकडे वेगळे करतो.

फिल्टरेशन युनिट :  सूक्ष्म कपड्यांच्या जाळ्यांद्वारे दर्जेदार बेसन चाळून घेते.विद्युत मोटार : ३ अश्वशक्ती (५, २ आणि १ अश्वशक्ती)

ही मिल कशी काम करते? 

  • टरफल निघालेले हरभऱ्याचे तुकडे /डाळ नियंत्रित प्रमाणात हॉपरमधून पल्व्हरायझरमध्ये टाकले जातात.
  • पल्व्हरायझरच्या आत ग्राइंडिंग प्लेट्सच्या आघात व कातर क्रियेमुळे दाणे बारिक पूड स्वरूपात दळले जातात.
  • दळलेली सामग्री खाली असलेल्या फ्लोअर कलेक्शन चेंबरमध्ये जमा होते.
  • ब्लोअरला जोडलेल्या अॅस्पिरेटरमुळे हवेचा झोत निर्माण होतो आणि दळलेली पूड कलेक्शन चेंबरमधून हवेसोबत खेचली जाते.
  • हवेचा प्रवाह दळलेली पूड एअर लॉक व्हॉल्व्हकडे सुरळीत व धूळ रहितरीत्या वाहून नेतो.
  • एअर लॉक व्हॉल्व्हमधून सामग्री पुढे जाते पण दाबातील संतुलन राखले जाते व हवा/धूळ बाहेर जाणे रोखले जाते.
  • वाहून आणलेली सामग्री फिल्टरेशन युनिटमध्ये प्रवेश करते.
  • बारीक बेसन फिल्टरच्या माध्यमातून खाली जाते, तर थोडे मोठे किंवा न दळलेले कण वेगळे राहतात.
  • फिल्टरमधून गेलेले बारीक बेसन खालच्या आउटलेटला जमा केला जातो.
  • फिल्टरमध्ये अडकलेले कण दळण्यासाठी पल्व्हायझरकडे परत पाठवले जाते.
  • दळण, सक्शन, गाळणे आणि पुनः संचलन ही प्रक्रिया सतत चालू राहते, ज्यामुळे एकसमान, उत्तम प्रतीचे बेसन कमी नुकसानात तयार होते.

व्यवसायासाठी नवी संधीशेतकरी 'पंदेकृवि मिनी बेसन मिल'च्या मदतीने अल्पि गुंतवणुकीत स्थानिक पातळीवर सहज व्यवसाय सुरू करू शकतात. शेतकरी स्वतःच्या शेतात उत्पादित हरभऱ्याची डाळ प्रक्रिया करून दर्जेदार बेसन तयार करू शकतात.

ते स्थानिक बाजार, आठवडे बाजार, किराणा दुकाने, स्वयंपाक केंद्रे, हॉटेल्स आणि ऑनलाइन माध्यमांद्वारे विकू शकतात. ही यंत्रणा युवकांसाठी अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उत्कृष्ट उद्योजकतेची संधी ठरू शकते.

प्रशिक्षण व संपर्क :'पंदेकृवि मिनी बेसन मिल'चा प्रभावी वापर, यंत्राची देखभाल, उत्पादन व्यवस्थापन, पॅकेजिंग व विपणन या सर्व बाबतीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागात प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध आहेत. इच्छुक शेतकरी, महिला गट व युवकांनी प्रत्यक्ष विद्यापीठात भेट देऊन किंवा संपर्क साधून यंत्र खरेदी, कार्यप्रणाली व व्यवसाय नियोजनासाठी आवश्यक मार्गदर्शन घ्यावे.

अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा : संशोधन अभियंता, कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (महाराष्ट्र)

English
हिंदी सारांश
Web Title : Start a profitable mini besan mill business with low investment.

Web Summary : Start a mini besan mill business with minimal investment and generate daily profits. This venture processes chickpeas into besan, offering a great opportunity for farmers and entrepreneurs to produce and sell quality besan locally. Training is available at Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola.
टॅग्स :व्यवसायशेती क्षेत्रमार्केट यार्ड