Join us

Medicinal Plant Scheme : फलोत्पादन अभियानात नव्या वनस्पतींचा समावेश; शेतकऱ्यांसाठी संधी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:57 IST

Medicinal Plant Scheme : शेतकऱ्यांसाठी आता पारंपरिक फळझाडांबरोबरच औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीसाठीही सरकारकडून अनुदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमात (MIDH) यांचा नव्याने समावेश करण्यात आला असून, इच्छुक शेतकऱ्यांकडून महाडीबीटी (MHDBT) पोर्टलवर अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

Medicinal Plant : शेतकऱ्यांसाठी आता पारंपरिक फळझाडांबरोबरच औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीसाठीही सरकारकडून अनुदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमात (MIDH) यांचा नव्याने समावेश करण्यात आला असून, इच्छुक शेतकऱ्यांकडून महाडीबीटी (MHDBT) पोर्टलवर अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

कोणकोणत्या औषधी वनस्पतीसाठी अनुदान?

या योजनेत खालील औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाते. यात अश्वगंधा, ब्राम्ही, ज्येष्ठमध, मुलेठी, शतावरी, कलिहारी, मंजिष्ठा, गुग्गूळ, कुटकी, जटामासी, विदारीकंद, चिराटा, तुलसी, पिंपळी, अतिस, पुष्करमूळ आदी वनस्पतींचा समावेश करण्यात आला आहे.

अशी आहे अनुदान रचना? 

औषधी वनस्पती लागवडीचा खर्च १,५०,००० प्रति हेक्टर प्रमाणे मिळतो.

अनुदान प्रमाण 

सर्वसाधारण क्षेत्रासाठी ४० टक्के अर्थसाहाय्य मिळते.

अनुसूचित/जास्त प्रमाणात आदिवासी असलेल्या क्षेत्रासाठी ५० टक्के अर्थसाहाय्य मिळते.

अधिकतम क्षेत्र : २ हेक्टर

महागड्या सुगंधी वनस्पतीसाठी अनुदान

शेतकऱ्यांनी बाजारमूल्य जास्त असलेल्या सुगंधी वनस्पतींची व्यावसायिक लागवड केली तरी त्यासाठी अनुदान उपलब्ध आहे.

समाविष्ट सुगंधी वनस्पती

गुलाब, जिरेनियम, कॅमोमाइल, निशिगंध, चंदन, दवणा, जाई, रोझमेरी, लॅव्हेंडर आदी सुगंधी वनस्पतींचा समावेश करण्यात आला आहे.

अनुदान रचना : सुगंधी वनस्पती

लागवडीचा खर्च मापदंड : १,२५,००० प्रति हेक्टर 

अनुदान प्रमाण

सर्वसाधारण क्षेत्र : ४० टक्के

अधिसूचित क्षेत्र : ५० टक्के

मर्यादा : जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत अनुदान

अर्ज प्रक्रिया

* अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जावे.

* तिथे 'फलोत्पादन घटक' अंतर्गत अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा.

* लागवडीच्या प्रस्तावाबरोबर संबंधित कागदपत्रे अपलोड करावीत.

अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी 

* ७/१२ उतारा 

* आधार कार्ड (Aadhaar Card)

* बँक पासबुकची झेरॉक्स 

* जातीचा दाखला (Caste Certificate) (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आदींसाठी)

* शेतकरी उत्पादन कार्ड / कृषी कार्ड (Farmer Identity Card) (जर उपलब्ध असेल तर)

* डिजिटल सायन इन केलेला अर्जाचा प्रिंट 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, औषधी व सुगंधी वनस्पतींमध्ये उत्पन्नासह बाजारात मागणीही प्रचंड आहे. या संधीचा उपयोग करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करून उत्पादनाच्या नव्या नव्या दिशा स्वीकाराव्यात.

औषधी आणि सुगंधी वनस्पतींची शेती ही उत्पन्नवाढीचा उत्तम पर्याय ठरू शकते. शाश्वत शेती आणि जैविक उत्पादनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना एक मोठी संधी आहे. सरकारच्या मदतीसह ही शेती आता अधिक फायदेशीर ठरू शकते.

हे ही वाचा सविस्तर : Micro Irrigation : सूक्ष्म सिंचनासाठी सुवर्णसंधी! शेतकऱ्यांना मिळणार थेट खात्यात अनुदान वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीइनडोअर प्लाण्ट्ससरकारी योजनाफलोत्पादन