Mango Orchard Branches Die : आंबा बागेतील फांद्या वाळण्याची किंवा मरण्याची समस्या (Mango Orchard Branches Die) अनेक कारणांमुळे येऊ शकते. आंबा बागेतील फांदीमर (Branch dieback) ही एक समस्या आहे जी आंबा पिकाला बाधित करते.
याचा परिणाम म्हणून, झाडाच्या फांद्या वाळायला लागतात आणि हळू हळू पूर्ण झाड मरते. या समस्येचे नियंत्रण करण्यासाठी, प्रादुर्भावित भागावरील साल काढावी आणि त्यावर बोर्डो पेस्ट लावावी. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास, फांद्या कापणे आवश्यक आहे. या दरम्यान नेमक्या काय उपाययोजना कराव्यात, हे पाहुयात....
आंबा बागेतील फांदेमर
- झाडावर फांदेमर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास प्रादुर्भावग्रस्त ठिकाणची साल उभी तडकल्यासारखी दिसते.
- त्यामध्ये पांढरट बुरशीची वाढ झालेली दिसते.
- फांदी शेंड्याकडून वाळत जाते. नवीन लागवड केलेल्या बागांमध्ये मुख्य खोडावर प्रादुर्भाव दिसून येतो.
- नियंत्रणासाठी फांद्या प्रादुर्भावग्रस्त भागाच्या दोन ते तीन इंच खाली कापून नष्ट कराव्या, कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी.
- पावसाची उघडीप असताना १ टक्का बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे खोड व फांद्या व्यवस्थित भिजतील, अशी फवारणी करावी.
- (पावसाची उघडीप असताना फवारणी करावी)
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी