Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mango Pest Management : आंब्याच्या खोडातून पडतोय भुसा? मग तात्काळ करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 12:11 IST

Mango Pest Management : आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खोड किडीचा वाढता प्रादुर्भाव मोठी डोकेदुखी ठरत आहे. 'किरुड' किंवा 'रोठा' म्हणून ओळखली जाणारी ही किड झाडाच्या खोडात पोखरून झाड आतून कमकुवत करते. वेळेत उपाययोजना न केल्यास संपूर्ण झाड वाळण्याचा धोका निर्माण होतो.(Mango Pest Management)

Mango Pest Management : आंबा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खोड किडीचा प्रादुर्भाव मोठे नुकसान ठरत आहे. ग्रामीण भागात किरुड किंवा रोठा म्हणून ओळखली जाणारी ही किड आंब्याच्या झाडाच्या खोडात आणि मुख्य फांद्यांमध्ये पोखरून झाड कमकुवत करते.(Mango Pest Management)

वेळेत नियंत्रण न केल्यास संपूर्ण झाड वाळण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बागेची नियमित पाहणी करून योग्य वेळी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.(Mango Pest Management)

खोड किडीची ओळख कशी कराल?

खोड किडीचा प्रादुर्भाव झालेल्या झाडांच्या खोडावर किंवा मुख्य फांद्यांवर लहान छिद्रे दिसून येतात. या छिद्रांमधून अळीने खाल्लेला लाकडी भुसा आणि विष्ठा बाहेर पडताना आढळते. 

झाडाची साल फाटून लोंबकळू लागते, कारण अळी आतील भाग पोखरत असते. सुरुवातीला झाडाच्या फांद्या पिवळ्या पडून सुकू लागतात आणि प्रादुर्भाव वाढल्यास संपूर्ण झाड वाळते.

या किडीची अळी दुधाळ रंगाची आणि मोठ्या आकाराची असते. तर प्रौढ भुंगा राखाडी रंगाचा असून त्याच्या पाठीवर नारंगी-पिवळे डाग दिसतात.

शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?

तज्ज्ञांच्या मते, जुलै-ऑगस्टपासून दर महिन्याला बागेतील झाडांची तपासणी करणे आवश्यक आहे. खोडावरील छिद्रांमध्ये तांब्याची किंवा लोखंडी तार घालून आतील जिवंत अळ्या नष्ट कराव्यात. तसेच प्रादुर्भावग्रस्त भागातील मृत साल खरवडून काढून झाड स्वच्छ ठेवावे.

रासायनिक नियंत्रण प्रभावी

खोड किडीवर नियंत्रणासाठी छिद्रे स्वच्छ करून त्यात क्लोरपायरीफॉस 20 EC किंवा डायक्लोरव्हॉस 76 EC औषध पाण्यात मिसळून इंजेक्शनच्या सहाय्याने टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

औषध टाकल्यानंतर छिद्र ओल्या चिकणमातीने किंवा पेट्रोल/रॉकेलमध्ये भिजवलेल्या कापसाने बंद करावे, जेणेकरून अळी बाहेर येणार नाही.

ऑक्टोबर महिन्यात झाडाच्या खोडावर जमिनीपासून चार ते पाच फूट उंचीपर्यंत बोर्डोपेस्ट लावल्यास नवीन अळ्यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे

* नवीन कलमांखाली येणारी फुटवेळी काढून टाकावीत

* बाग तणविरहित आणि स्वच्छ ठेवावी

* जास्त प्रादुर्भाव झाल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड पेस्ट वापरावी

* झाडांच्या खोडाची नियमित तपासणी करावी

वेळेत उपाययोजना केल्यास आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान टाळता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उशीर न करता खोड किडीवर नियंत्रणासाठी तातडीने उपाय करावेत, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.

(लेखक डॉ. अंगद प्र. गरडे, प्रा. आर. आर. राठोड, सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहेत.)

(लेखक डॉ. एम. बी. पाटील, प्राचार्य, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी येथे कार्यरत आहेत.)

हे ही वाचा सविस्तर : Kitchen Smoke Health Effects : स्वयंपाकघरातील धुरामुळे फुफ्फुसांचे आजार वाढतायत? वेळीच सावध व्हा जाणून घ्या उपाय

अधिक वाचा : Seed Germination Test : चमकदार बियाण्यांना फसू नका; पेरणीपूर्वी 'ही' टेस्ट कराच

English
हिंदी सारांश
Web Title : Effective Mango Pest Management: Identify and eliminate trunk borers promptly.

Web Summary : Mango farmers face losses from trunk borers. Identify infestations by boreholes and sawdust. Use copper/iron wire to kill larvae. Apply Chlorpyrifos or Dichlorvos. Apply Bordo paste in October. Keep orchards clean for prevention. Act promptly!
टॅग्स :शेती क्षेत्रआंबाआंबाशेतकरीशेती