Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याच्या बागेला 'हे' काम करा, नवीन कलमांच्या वाढीसाठी बेस्ट पर्याय, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 19:35 IST

Mango Crop : नवीन कलमांची निगा म्हणजे कलमे लावल्यानंतर त्यांची योग्य काळजी घेणे...

Mango Crop : नवीन आंबा बॅग लावल्यानंतर विशेष काळजी घ्यावी लागते. यामध्ये नवीन कलमांची निगा म्हणजे कलमे लावल्यानंतर त्यांची योग्य काळजी घेणे, ज्यात योग्य पाणी देणे, वाऱ्यापासून संरक्षण करणे (बांबूचा आधार देणे), यासह कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, ते समजून घेऊयात... 

नवीन कलमांची निगा

  • कलमाच्या दोन बाजूंना दोन काठ्या रोवून त्यावर छोट्या काठ्या आडव्या बांधाव्यात. 
  • तयार झालेल्या शिडीसारख्या आधाराला कलम दोन ठिकाणी सैलसर बांधून घ्यावे.
  • भटकी जनावरे, वन्यप्राणी यांच्यापासून बागेच्या संरक्षणासाठी कुंपण करावे. 
  • कुंपण सहा फुटांपर्यंत उंच असल्यास वानरसुद्धा बागेत प्रवेश करू शकणार नाहीत.
  • नवीन बागेमध्ये पाणी देण्यासाठी प्राधान्याने ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. 
  • कलमाच्या दोन्ही बाजूंस नऊ इंचांवर दोन ड्रीपर्स येतील असे नियोजन करावे.
  • वेळापत्रकानुसार शिफारशीप्रमाणे घन खते किंवा विद्राव्य खते द्यावीत.
  • आंतरमशागत करताना आंबा कलमांना इजा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
  • कलमांचे कीड व रोगांपासून संरक्षण व्हावे, यासाठी बागेचे नियमित सर्वेक्षण करावे. 
  • वेळच्या वेळी नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्या.
  • योग्यवेळी छाटणी करून कलमाचा सांगाडा व्यवस्थित तयार करून घ्यावा.
  • बागेच्या सभोवती वारा प्रतिरोधक वनस्पतींची लागवड करावी.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Mango Orchard Care: Best Practices for New Graft Growth Explained

Web Summary : Proper care is crucial for new mango grafts. Support saplings, protect from animals with fencing, and use drip irrigation. Fertilize as recommended, prevent damage during inter-cultivation, monitor for pests, prune regularly, and plant windbreakers.
टॅग्स :आंबापीक व्यवस्थापनशेतीशेती क्षेत्र