Mahadbt Lottery List : कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या (Krushi Yantrikikaran Yojana) सोडतीनंतर आता ऊस तोडणी यंत्राची सोडत काढण्यात आली आहे. या सोडत यादीमध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांची निवड झालेली आहे. शेतकऱ्यांनी यादीत नाव पाहून महाडीबीटी पोर्टलवर (Mahadbt Lottery List) कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निवड यादीमध्ये अकोला, अमरावती, अहिल्यानगर, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, जालना, धाराशिव, धुळे, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सोलापूर, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
महाडीबीटी पोर्टलवर जाऊन जिल्हानिहाय किंवा गावनिहाय यादी पाहता येईल.
दरम्यान महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत असून या अनुषंगाने ऊसतोड यंत्र योजने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. याबाबतची सोडत काढण्यात आली आहे.
मुदतीत कागदपत्रे अपलोड करा...आता ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर जाऊन कागदपत्रे अपलोड करावयाचे आहेत. यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आले आहे.
या मुदतीत कागदपत्रे अपलोड न झाल्यास किंवा न केल्यास पुन्हा संबंधित शेतकऱ्यांना मोबाईल द्वारे मॅसेज पाठवून आणखी तीन दिवसांची मुदत दिली जाईल. या मुदतीत जे शेतकरी कागदपत्र अपलोड करणार नाहीत, त्यांचे अर्ज करण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे.
महत्वाचे : अधिकृत माहितीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा किंवा तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधावा.