Join us

कृषी यंत्र आणि तुषार/ठिबकसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी 'ही' कागदपत्रे अपलोड करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 14:40 IST

Mahdbt Lottery List : अशा शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. नेमकी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, ते पाहुयात... 

Mahdbt Lottery List :    महाडीबीटी पोर्टलद्वारे कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत कृषी यंत्र आणि तुषार/ठिबक सिंचन योजनेची सोडत काढण्यात आली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची या सॊडतीद्वारे निवड करण्यात आलेली आहे. अशा शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. नेमकी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, ते पाहुयात... 

कृषि यंत्र साठी निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे

अनिवार्य कागदपत्रे 

  1. यंत्राचे कोटेशन
  2. यंत्राचा टेस्ट रीपोर्ट
  3. ट्रॅक्टर RC (ट्रॅक्टर चलित यंत्रांकरिता)
  4. बँक पासबूक

आवश्यक असेल तर

  1. वैध जात प्रमाणपत्र
  2. संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र
  3. शॉप डीलरशिप प्रमाणपत्र (अधिकृत विक्रेता असलेबाबत)

तुषार/ठिबक साठी निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे

अनिवार्य कागदपत्रे

  1. हमीपत्र (परिशिष्ट 7)
  2. सूक्ष्म सिंचन दरपत्रक (कोटेशन)
  3. बँक पासबूक

आवश्यक असेल तर

  1. संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र
  2. वैध जात प्रमाणपत्र
  3. सिंचन स्रोत स्वयंघोषणापत्र

तसेच 7/12 उतारा, 8अ उतारा व आधार हे कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही. 

टॅग्स :कृषी योजनाशेतीशेती क्षेत्र