Magel Tyala Solar : मागेल त्याला सोलर पंप (Magel Tyala Solar Yojana) या योजनेच्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पेमेंट देखील केले आहे. मात्र काही शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी असल्याने संबंधित अर्ज होल्डवर ठेवण्यात आल्याचे अर्जाची स्थिती तपासल्यानंतर लक्षात येत आहे. अशा स्थितीत मागेल त्याला सोलर पंप (Solar Pump) योजनेच्या अर्जामध्ये आलेली त्रुटी दूर कशी करायची हेच आजच्या लेखातून जाणून घेऊयात...
अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
- सर्वप्रथम मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या या https://www.mahadiscom.in/ अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे.
- वेबसाईटवर आल्यानंतर लाभार्थी सुविधांमध्ये अर्जाची सद्यस्थिती हा पर्याय दाखवला जाईल.
- अर्जाची सद्यस्थिती या पर्यायावर क्लिक करा, यावर एम के आयडी एंटर करून सर्च करा.
- सर्च केल्यानंतर आपल्या अर्जामध्ये त्रुटी असल्यास ती दाखवली जाईल. यानुसार आपला होल्डवर अर्ज ठेवलेला आहे, असे दाखवले जाईल.
- यांनतर पुन्हा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 'अप्लाय करू इच्छिता का? असे विचारले जाईल. तर त्याला Yes करा.
- यानंतर खाली त्रुटी दाखवली जाईल. यामध्ये कागदपत्रांची त्रुटी असू शकते. जसे की, चुकीचा सातबारा, सामायिक क्षेत्राचे संमतीपत्र किंवा कागदपत्र अस्पष्ट असणे. यात बँक, आधारकार्ड इत्यादी, किंवा इतरही वेगवेगळ्या त्रुटी असू शकतात.
- जर कागदपत्रांची त्रुटी असल्यास पुन्हा अपलोड करावे लागतील.
- यासाठी अपलोड करावयाच्या कागदपत्राची साईज 500 केबी पेक्षा कमी असावी. 500 kb पेक्षा मोठी साईज असल्यास अपलोड करता येणार नाही.
- यासाठी संबंधित कागदपत्रे 500 केबी पेक्षा कमी साइजमध्ये करून सेव्ह करा.
- यानंतर अपलोडवर क्लिक करून फाईल अपलोड करा.
- खाली Submit बटनावर क्लिक करा.
- सबमिट केल्यानंतर मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल.
- मोबाईलवर आलेल्या ओटीपी एंटर करून व्हेरिफायवर क्लिक करा.
- ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर त्रुटी काढण्यासाठी अर्ज पुन्हा सबमिट होईल. request submit successfully असा मॅसेज येईल.
- यांनतर पुन्हा लाभार्थी सुविधांमध्ये येऊन अर्जाच्या सद्यस्थितीवर आपला आयडी टाकून सर्च केल्यानंतर पाहता येईल.
- अर्जातील त्रुटी निघून आता अर्ज पुन्हा approval साठी सबमिट करण्यात आलेला आहे, असे सांगितले जाईल.
Magel Tyala Solar : मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर