Cotton Crop Management : कपाशी पिकात अति प्रमाणात ओलावा (Water logging ) हा एक अतिशय महत्वाचा ताण (Stress) पिकावर निर्माण करतो. त्यामुळे पिकाच्या शरीरक्रिया (Physiological) व पोषण (Nutritional) प्रॉब्लेम्स निर्माण करते. वॉटर लॉगिंग परिस्थिती निर्माण झाल्यास मुळाभोवतालची प्राणवायुची जागा पाणी घेते. त्यामुळे जमिनीतील प्राणवायूचे प्रमाण कमी होते.
याचा परिणाम मुळाच्या व पिकाच्या वाढीवर होते परिणामी पीक मुळा मार्फत अन्नद्रवे शोषून घेऊ शकत नाही. पिकाची मुळे अकार्यक्षम बनतात. पिकाची मुळे अन्नद्रव्य शोषू न शकल्यामुळे पीक हळूहळू पिवळे पडण्यास सुरवात होते, पिकाची वाढ थांबते, पीक कीड व रोगास बळी पडते. परिणामी उत्पादनात लक्षणीय घट येते.
जमिनीतील प्राणवायुचे प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीचे रेडोक्स potential क्षमता बदलते. त्यामुळे जमिनीतील नायत्रेट स्वरूपातील नत्र denitrification प्रक्रियेद्वारे अमोनिया स्वरूपात उढून जाते परिणामी पिकास नत्राची कमतरता जाणवते.
उपाय योजना काय कराव्यात?
- चर काढून साठलेले काढून टाकावे व शेतातील निचारा प्रणाली सुधारावी.
- कपाशी पिकावर 2% युरिया (2 किलो युरिया 100 लिटर पाण्यातून) किंवा 1.5% 19:19:19 फवारणी करावी.
- 2% पालश (पोटॅशियम नायत्रेट / म्युरेट ऑफ पोटॅश) तसेच 0.1- 0.2% बोरॅक्स (100 - 200 ग्रॅम बोरॅक्स 200 लिटर पाण्यातून ), 0.5% झिंक सल्फेट (500 ग्रॅम झिंक सल्फेट 100 लिटर पाण्यातून) 0.5 ग्रॅम लोह (आयर्न) या सूक्ष्मअन्नद्रवाची फवारणी करावी.
- परंतू हे लक्षात घ्यावे की, फवारणी द्वारे दिलेली खते ही जमिनीतून देण्यात येणाऱ्या खतास पर्याय ठरत नाहीत. त्यामुळे पाण्याचा नीचारा होताच शिफाराशीत खताची मात्रा जमिनीतून द्यावी.
- डॉ. अरुण कांबळे
जमिनीचे वाद मिटवण्यासाठी आता शेतरस्त्यांबाबत महत्वाचा निर्णय, वाचा सविस्तर