Join us
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीची वाटणी म्हणजे खातेवाटप कसे करायचे, हरकत असल्यास काय करावे? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:15 IST

Jamin Khate Vatap : एकत्रित नावावर असलेली जमीन वेगवेगळ्या वारसांमध्ये विभागून त्यांचे स्वतंत्र खाते (७/१२ उतारा) तयार करणे.

Jamin Khate Vatap :    जमिनीचे खाते वाटप (खातेदारांमध्ये वाटणी) म्हणजे एकत्रित नावावर असलेली जमीन वेगवेगळ्या वारसांमध्ये कायदेशीर पद्धतीने विभागून त्यांचे स्वतंत्र खाते (७/१२ उतारा) तयार करणे. ही प्रक्रिया महाराष्ट्रात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (Maharashtra Land Revenue Code) व वारसा कायद्यानुसार केली जाते.

खाते वाटप म्हणजे काय ?एकाच ७/१२ उताऱ्यावर जर एकापेक्षा जास्त लोकांची नावे (उदा. भावंडं, वारस) असतील, तर त्यातून प्रत्येकाचा हिस्सा स्वतंत्रपणे दाखवण्याची प्रक्रिया म्हणजे खाते वाटप. यानंतर प्रत्येक खातेदारास स्वतःच्या जमिनीचा स्वतंत्र सातबारा मिळतो.

खाते वाटपाची प्रक्रियासर्व खातेदारांची सहमती आवश्यक सर्व व्यक्तींनी आपल्या हिस्स्याचे स्पष्ट प्रमाण मान्य करणे आवश्यक आहे. तोंडी न करता लेखी वाटपाचा अर्ज / पत्र तयार करणे आवश्यक.

खाते वाटपाचा अर्ज तयार करातहसील कार्यालयात नमुना अर्ज मिळतो. या अर्जामध्ये सर्व खातेदारांची नावे, शेतीचे गट नंबर, क्षेत्रफळ, गाव व तालुका. ७/१२ व ८-अ उतारे (जमीनचा पुरावा). वारस नोंद असल्यास वारस प्रमाणपत्र. ओळखपत्रे (आधार, पॅन, इ.). संमती पत्र (अर्जात समाविष्ट). कधी कधी नकाशा (गाव नमुना २) सुद्धा लागतो. आणि महत्वाचे एकमेकांची संमती. 

यानंतर सर्वप्रथम तलाठीकडे अर्ज द्यावा. तलाठी जमिनीची स्थिती तपासतो, आणि पुढील शिफारस करतो. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याकडून पंचनामा /पाहणी संबंधित जमीन भागणी योग्य आहे की नाही हे ते पाहतात. एकत्रित पाहणी व पंचनामा करून अहवाल तयार करतात. तहसील कार्यालयात खाते वाटपाचा आदेश तहसीलदार खातेदारांच्या संमतीवर आधारित आदेश काढतो. नवे स्वतंत्र ७/१२ उतारे तयार होतात.

खाते वाटपात वाद असल्यास काय करावे?जर कुटुंबातील सदस्यांमध्ये हिस्सा पटत नसेल, तर तहसीलदार वाटपाचा आदेश देत नाही. अशा परिस्थितीत सिव्हिल कोर्टात (न्यायालयात) वाटणीसाठी दावा करावा लागतो. न्यायालय निर्णय दिल्यावर त्याच्या आधारे खाते वाटप होते. किंवा कुणालाही वाटपावर आक्षेप असल्यास तो ७/१२ वर 'हरकतदार' म्हणून नोंदवू शकतो. त्यानंतर खाते वाटप प्रक्रियेवर तहसीलदार निर्णय घेतो किंवा ती ती न्यायालयात पाठवतो.

असा करा ऑनलाइन अर्ज खाते वाटपासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो, तो कसा तर महाराष्ट्र सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या पोर्टलवर लॉगिन करा. यातील "Revenue Department या पर्यायावर क्लिक करा. त्यांनतर Partition of Land" हा पर्याय निवडा. या ठिकाणी संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. 

महत्वाचे : अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयात संपर्क साधा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Land Partition: Process, Application, and Dispute Resolution Explained Simply

Web Summary : Land partition divides jointly owned land among heirs, creating separate records. Apply at the Tahsil office with necessary documents. Disputes require court intervention. Online applications are also available.
टॅग्स :जमीन खरेदीशेती क्षेत्रशेतीशेतकरी