अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सडेगाव येथील तरुण प्रगतशील शेतकरी प्रमोद धोंडे पाटील यांच्या शेतात १.० हेक्टर क्षेत्रावर घेण्यात आलेले आहे. डिसेंबर २०२५ मध्ये कापून गेलेल्या ऊस पिकाच्या खोडव्यात उरलेल्या पाचटची ट्रॅक्टर संचलित यंत्राद्वारा कुट्टी करून उन्हाळ्यात मूग पिकाचे आंतरपीक घेऊन उत्पादन वाढवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.
ऊस पिकात डाळवर्गीय मूग पिक आंतरपीक घेऊन मुख्य ऊस पिकाची अधिकतम उत्पादकता कसे वाढवता येईल आणि सोबतच जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. ऊस पिकात पाण्याचा आणि रासायनिक खतांचा अतिवापर होत असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील जमिनी क्षारपट होत असुन जमिनीचा सामू (PH) वाढत आहे.
प्रगतशील शेतकरी प्रमोद धोंडे पाटील यांच्या शेतजमिनीत मागील दोन वर्षापासून हा प्रयोग घेत आहे. ऊस पिकाच्या खोडव्यात कडधान्य पिकाची घन पद्धतीने जानेवारी महिन्यात लागवड करून मुख्य पीक ऊसाचे विक्रमी उत्पादन आणि मूग पिकाचे दुय्यम उत्पन्न मागील प्रयोगातून मिळालेले आहे. पाण्याचा अतिरेक वापर आणि रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत खराब होऊन उत्पादकता कमी होत चालली आहे.
अशा स्थितीत जमिनीची सुपीकता वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. रासायनिक खतांचा वारेमाप वापर कमी होणे गरजेचे असून, पिकांची फेरपालट होणे आवश्यक आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ऊस पिकात मूग पिकाचे आंतरपीक घेऊन धोंडे यांनी उसाची उत्पादकता वाढवून दाखवली आहे. सोबत जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाल्याचे त्याचे निष्कर्ष आहेत.
खालील प्रमाणे लागवडीचे सूत्र वापरण्यात आले आहे.
ऊस पीक कापणी नंतर त्याठिकाणी राहिलेल्या ऊसाच्या पाचटची ट्रॅक्टर संचलित यंत्राद्वारा कुट्टी केली. ट्रॅक्टरच्या सहाय्याने उसाच्या दोन्ही बाजूने बगला फोडून, उसाचे बुडखे कट करून त्यामध्ये कमी प्रमाणात रासायनिक खत वापरून मूग पिकाच्या फुले सुवर्ण जातीची घण पद्धतीने १६ जानेवारी रोजी पेरणी करण्यात आली आहे.
मूग बियाणे हेक्टरी २० किलो वापरण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ द्वारा निर्मित आणि केंद्रीय जात समिती द्वारा २०२४ मध्ये शिफारशीत फुले सुवर्ण नावाची मूग पिकाची जात वापरण्यामागे उद्देश असा आहे की ही जात फक्त ५५ दिवसात काढणीस येते, एकाच वेळेस पक्कवतेस येते, भुरी रोगास प्रतिकारक्षम आणि कोणत्याही वातावरणात तग धरण्याची क्षमता ह्या जातीत आहे.
संपूर्ण भारतात न लोळणारे (lodging resistance) वाण आणि मशीन द्वारा काढणीस योग्य वाण म्हणुन या जातीस प्रसिद्धी मिळत आहे. मूग पिकाची पेरणी केलेल्या क्षेत्रात तुषार सिंचनाने गरजे नुसार मोजके पाणी देण्यात आले आहे. बुरशीनाशकाची एक फवारणी केलेली आहे. मूग पिकाची उगवण निरोगी चांगल्या पद्धतीने झाली आहे. आज रोजी ऊस पिकाच्या खोडव्यात पेरलेल्या मूग पिक ३० दिवसाचे झालेले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कडधान्य प्रकल्प जळगावचे कडधान्य पैदासकर डॉ. सुमेरसिंग राजपुत यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर मोठ्या क्षेत्रावर उन्हाळी हंगामात ऊस पीक कापणीनंतर ऊसाच्या पाचटची कुट्टी करून ऊसाच्या दोन सरीमधील अंतरात मूग पिकाची लागवडीचा प्रयोग केला आहे.
Web Summary : Rahuri farmer uses intercropping mung beans in sugarcane ratoons to boost yield and soil health. This sustainable method, guided by agricultural experts, involves mulching sugarcane residue, planting mung beans, and efficient irrigation, improving soil fertility and reducing chemical fertilizer use for better yields.
Web Summary : राहुरी के किसान गन्ने के अवशेष में मूंग की अंतः फसल से उपज और मिट्टी के स्वास्थ्य को बढ़ावा दे रहे हैं। कृषि विशेषज्ञों द्वारा निर्देशित इस टिकाऊ विधि में गन्ने के अवशेष को मल्चिंग करना, मूंग की फलियाँ लगाना और कुशल सिंचाई शामिल है, जिससे मिट्टी की उर्वरता में सुधार होता है और बेहतर उपज के लिए रासायनिक उर्वरक का उपयोग कम होता है।