Grape Farming : द्राक्ष मण्याचा उच्च दर्जा हा प्रामुख्याने मण्याचा मोठा आकार, आकर्षक रंग, एकसारखेपणा, चव आणि कडकपणा यावर अवलंबून असतो.
निर्यातक्षम द्राक्षांसाठी लांबलचक मणी, योग्य साखर, मण्यांची विरळणी आणि डागविरहित त्वचा आवश्यक असते. वरीलप्रमाणे मण्यांचा दर्जा मिळवण्यासाठी काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
द्राक्ष मण्याचा दर्जाया वर्षी थंडीचा प्रभाव असल्याने बहुतांश बागांमध्ये पाने तुलनेने छोटी राहिल्याचे दिसून येते. वाढीच्या सर्व अवस्था साधारण ८ ते १० दिवस उशिरा दिसल्या. मात्र मण्यांमध्ये मऊपणा अपेक्षेपेक्षा लवकर, म्हणजे छाटणीनंतर सुमारे ८० दिवसांत सुरू झाला आहे. त्यामुळे मण्यांची फुगवण आणि साखरेची वाढ अपेक्षेप्रमाणे होईल, याबाबत साशंकता आहे.
ज्या बागेत काढणीसाठी अजूनही ३५ ते ४० दिवसांपेक्षा जास्त वेळ आहे, अशा बागेत साखरेची वाढ अपेक्षित मिळविण्यासाठी मण्यांची हलकी थिनिंग केल्यास फायदा होईल. विशेषतः बेदाण्यासाठी टीएसएस २२ पेक्षा जास्त लागतो.
सध्याच्या परिस्थितीत टीएसएस २२ होण्यास जास्त वेळ लागेल. मार्च, एप्रिल महिन्यात पावसाळी वातावरण तयार होऊन बेदाणे सुकविण्याच्या काळाच आर्द्रता वाढल्यास बेदाण्याचा दर्जा खालविण्याची शक्यता आहे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
Web Summary : Grape quality hinges on size, color, and sugar. Thinning berries in late-season vineyards needing higher sugar (TSS) for raisin production can help. Rain in March/April might lower raisin quality, warns the research center.
Web Summary : अंगूर की गुणवत्ता आकार, रंग और चीनी पर निर्भर करती है। किशमिश उत्पादन के लिए उच्च चीनी (टीएसएस) की आवश्यकता वाले देर के मौसम के अंगूर के बागों में जामुन को पतला करने से मदद मिल सकती है। मार्च/अप्रैल में बारिश से किशमिश की गुणवत्ता कम हो सकती है, अनुसंधान केंद्र ने चेतावनी दी है।