Join us
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब पिकाच्या आंबिया बहरातील फेब्रुवारीतील पीक नियमन कसे करावे? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 20:18 IST

Dalimb Crop Management : डाळिंब पिकाच्या बाबतील फेब्रुवारी महिन्यात (अंबिया बहार) पिक नियमन करणे महत्वाचे आहे.

Dalimb Crop Management :  डाळिंब पिकाच्या बाबतील फेब्रुवारी महिन्यात (अंबिया बहार) पिक नियमन करणे महत्वाचे आहे. सध्या डाळिंब पीक नवीन पालवी फुटण्याची अवस्थेत असून या काळात विशेष काळजी घ्यावी लागते. 

डाळिंब - आंबिया बहार (फेब्रुवारी पिक नियमन)कीड व्यवस्थापननवीन पालवी फुटण्याची अवस्थापहिले पाणी दिल्यानंतर १० ते १५ दिवसांनी निळे किंवा पिवळे चिकट सापळे २५ ते ३० सापळे प्रती एकर याप्रमाणे झाडाच्या सर्वात उंच फांदीपासून १० ते १५ सें.मी. खाली बांधवे. हे सापळे चिकटलेल्या किडीनुसार २० ते २५ दिवसांनी बदलावेत.

वाढीची अवस्थाॲझाडिरॅक्टिन / कडुनिंब तेल १% (१० हजार पीपीएम) ३ मिली किंवा करंज तेल ३ मिली किंवा वरील दोन्ही तेलांचे मिश्रण प्रत्येकी ३ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे आवश्यकतेनुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने एक-दोन फवारण्या घ्याव्यात.

फुलधारणा / फुलकळी येण्याची अवस्था७ ते १० दिवसांच्या अंतराने सायअँट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) ०.९ मिली किंवा क्लोर अँट्रानिलीप्रोल (१८.५ थायक्लोप्रिड (४८० एससी) ०.५ मिली अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ एससी) ०.३ मिली किंवा फ्लुबेन्डीॲमाइड मिली लिटर पाणी याप्रमाणे एक-दोन फवारण्या घ्याव्यात.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी  

English
हिंदी सारांश
Web Title : Pomegranate Crop Management: February Tips for Ambiya Bahar Regulation

Web Summary : February is crucial for pomegranate crop regulation. Manage pests using sticky traps and neem oil during new growth. Apply recommended insecticides for flowering.
टॅग्स :डाळिंबशेती क्षेत्रपीक व्यवस्थापनशेती