Dalimb Disease : डाळिंब पिकावर (Pomegranate Disease) अनेक किडींचा प्रादुर्भाव होतो, अशा किडींचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे असते. जेणेकरून अधिक नुकसान होणार नाही. यामध्ये प्रामुख्याने डाळिंब फळ पोखरणारी अळी, रस शोषणारे भुंगेरे या किडींचा समावेश होतो. या किडींचे नियंत्रण कसे करावे? हे पाहुयात....
कीड व्यवस्थापन
फळ पोखरणारी अळीअळी किंवा अंडी यांचा कमी प्रादुर्भाव असल्यास एकच फवारणी घ्यावी. जास्त प्रादुर्भावाच्या स्थितीत पुढील प्रमाणे ७ते १० दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.अंडी आढळून आल्यास, ॲझाडिरॅक्टिन किंवा कडुनिंब तेल (१० हजार पीपीएम) ३ मि.ली. किंवा करंज तेल ३ मि.ली. किंवा वरील दोन्ही तेलांचे मिश्रण प्रत्येकी ३ मि.ली. प्रति लिटर पाणीखराब झालेली / छिद्र असलेली फळे दिसत असल्यास, सर्व खराब झालेली आणि छिद्र असलेली फळ काढून खड्ड्यात पुरून टाकावीत. सायॲण्ट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मि.ली. किंवा क्लोर ॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाणी.
रस शोषणारे भुंगेरेथायमिथॉक्झाम (१२.६%) + लॅमडा सायहॅलोथ्रिन (९.५% झेडसी) ०.५० मि.लि. किंवा स्पिनेटोरम (२.५ एससी) १ मि.लि. किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी