Join us
Daily Top 2Weekly Top 5

हरभऱ्याची अवास्तव शाकीय वाढ कशामुळे होते, त्यावर उपाय काय करावा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 16:10 IST

Harbhara Crop : हरभऱ्याची अवास्तव शाकीय वाढ कशामुळे होते. अशावेळी हरभरा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे, हे पाहुयात... 

Harbhara Crop : हरभऱ्याची भारी जमिनीत लागवड, सिंचनाचे चुकीचे व्यवस्थापन, नत्राचा अतिरिक्त वापर यामुळे पिकाची अवास्तव शाकीय वाढ होते. घाटे कमी प्रमाणात लागतात, त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते. अशावेळी हरभरा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे, हे पाहुयात... 

हरभऱ्याची अवास्तव शाकीय वाढ 

  • यासाठी सिंचनाचे व्यवस्थापन करताना पेरणीपूर्वी ओलित करावे. 
  • त्यानंतर प्रारंभिक वाढीची अवस्था संपल्यावर जातींनुसार फुलकळी लागण्याच्या अवस्थेच्या सुरुवातीस पाण्याची पाळी द्यावी. 
  • तुषार सिंचनाचा वापर करताना जमिनीचा मगदूर, पाण्याचे प्रमाण यानुसार तुषार सिंचन संच चालविण्याचा कालावधी ठरवावा. 
  • पुढे आवश्यकतेप्रमाणे जमिनीतील ओल लक्षात घेऊन घाट्यांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे. 
  • ग्रामीण भागामध्ये हरभरा पीक खुरपताना महिला घरच्या भाजीसाठी झाडांचे शेंडे खुडतात. 
  • याद्वारेही अवास्तव वाढ रोखली जाऊ शकते. 
  • अलीकडच्या काळात शेंडे खुडणीसाठी छोट्या शेंडे खुडणी यंत्रांचा वापर वाढला आहे. 
  • यासाठी पेरणीपासून साधारणपणे चार आठवड्यांचा कालावधी योग्य आहे. 
  • अन्यथा तज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत वाढरोधक रसायनांचा फवारणीद्वारे वापर केला जाऊ शकतो.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापनरब्बी हंगाम