Join us
Daily Top 2Weekly Top 5

Harbhara Crop : हरभरा पिकावरील घाटे अळीचे नियंत्रण कसे कराल, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 20:20 IST

Harbhara Crop : हरभरा घाटे अळी ही हरभरा पिकातील एक प्रमुख समस्या असून, ज्यामुळे मोठे नुकसान होते. 

Harbhara Crop :  हरभरा घाटे अळी ही हरभरा पिकातील एक प्रमुख समस्या असून, या अळ्या फुले आणि घाट्यांमध्ये शिरून दाणे खातात, ज्यामुळे मोठे नुकसान होते. 

यावर नियंत्रणासाठी पिकाचे नियमित सर्वेक्षण करून, प्रादुर्भाव आढळल्यास आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार जैविक किंवा रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा, तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खोल नांगरणी, फेरपालट आणि कामगंध सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो. 

घाटे अळीचे नियंत्रण 

  • घाटे अळीच्या प्रादुर्भाव दिसून येताच ५ टक्के निंबोळी आर्काची फवारणी करावी.
  • ढगाळ हवामान असल्यामुळे जिरायती हरभऱ्यामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यासाठी एच.एन.पी.व्ही.
  • या विषाणूची १० मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • हरभरा सारख्या संवेदनशील पिकांचे दंव प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी, सल्फ्यूरिक ऍसिड @ 0.1% (1 लिटर H2SO4 1000 लिटर पाण्यात) किंवा थायोरिया @ 500 पीपीएम (500 ग्रॅम थायोरिया 1000 लिटर पाण्यात मिसळून) फवारणी करा.
  • थंडीपासून हरभरा पिकाचे संरक्षण करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी हलके व वारंवार पाणी / तुषार सिंचन च्या सहाय्याने द्यावे.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Control Chickpea Pod Borer: Effective Methods for Harbhara Crop Protection

Web Summary : Chickpea pod borer causes significant damage. Regular monitoring, biological or chemical insecticides, deep plowing, crop rotation, and pheromone traps are crucial for control. Neem oil, HNPV, sulfuric acid, or thiourea sprays, and light irrigation help protect the crop.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापनरब्बी हंगाम