Rabbi Season : हरभऱ्याच्या शेतात “मर, मूळकूज आणि मानकूज” हे रोग लपून बसलेले शत्रू आहेत. हे रोग बियाण्यांद्वारे व जमिनीद्वारे पसरतात. त्यामुळे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अनिवार्य असते. नेमकी ही बीजप्रक्रिया कशी करायची, तिचे फायदे काय आहेत, हे समजून घेऊयात...
बीजप्रक्रिया म्हणजे काय?बियाण्यांना संरक्षक कवच देणे म्हणजेच बीजप्रक्रिया! औषधी व जैविक घटकांच्या साहाय्याने बियाण्यांचे रोगांपासून संरक्षण करून निरोगी अंकुरांची पायाभरणी केली जाते.
बीजप्रक्रियेचे फायदे :
- बियाणे रोगमुक्त राहतात
- उगवण जलद व समसमान होते
- रोपं मजबूत, टणक आणि निरोगी वाढतात
- जमिनीत नत्राची वाढ होते
- स्फुरदाचे शोषण अधिक चांगले
- उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ!
बीजप्रक्रियेचे ३ टप्पे – चरण-दर-चरण मार्गदर्शक
रासायनिक प्रक्रिया :-थायरम – २ ग्रॅम + कार्बेन्डाझिम – १ ग्रॅमहे मिश्रण प्रति किलो बियाण्यावर लावासावलीत वाळवा (सूर्यप्रकाश टाळा)
जैविक प्रक्रिया :वाळलेल्या बियाण्यावर रायझोबियम कल्चर – २५ ग्रॅम प्रति किलो लावा. १ लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ मिसळा. या मिश्रणात कल्चर मिसळून बियाणे चोळा. सावलीत वाळवा
PSB प्रक्रिया (फॉस्फेट सॉल्युबिलायझिंग बॅक्टेरिया):-
- PSB – २५० ग्रॅम / १०–१५ किलो बियाणे
- स्फुरदाचा वापर सुधारतो आणि वाढ जोमदार होते
महत्वाच्या सूचना :
- रासायनिक व जैविक प्रक्रिया एकत्र करू नका
- प्रक्रिया नेहमी सावलीत करा
- प्रथम बुरशीनाशक → नंतर कीटकनाशक → शेवटी जीवाणू खत
- प्रक्रिया केलेले बियाणे २४ तासांच्या आत पेरा
मिळणारे फायदे :
- रोगांचा प्रसार थांबतो
- अंकुर दर वाढतो
- रोपं तगडी व निरोगी होतात
- उत्पादनात हमखास वाढ
- कृषी विभाग व आत्मा नाशिक
Web Summary : Protect chickpea seeds from diseases like root rot by seed treatment. This simple process boosts germination, strengthens plants, enhances nutrient absorption, and increases yields by 10-15%. Follow chemical, biological, and PSB treatment steps carefully for best results.
Web Summary : चने के बीजों को जड़ सड़न जैसे रोगों से बचाने के लिए बीज उपचार करें। यह प्रक्रिया अंकुरण बढ़ाती है, पौधों को मजबूत करती है, पोषक तत्वों के अवशोषण को बढ़ाती है और उपज को 10-15% तक बढ़ाती है। सर्वोत्तम परिणामों के लिए रासायनिक, जैविक और पीएसबी उपचार चरणों का सावधानीपूर्वक पालन करें।