Join us

Grape Farming : द्राक्ष बागेत कलम करण्याची योग्य पद्धत समजून घेऊया, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:32 IST

Grape Farming : नवीन द्राक्षबाग लागवड (Draksh Lagvad) करताना द्राक्ष कलम करणे ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे

Grape Farming :    नवीन द्राक्षबाग लागवड (Draksh Lagvad) करताना द्राक्ष कलम करणे ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. यामुळे शेतकऱ्यांना द्राक्षाच्या योग्य जातीची निवड करून नवीन द्राक्षबाग लावता येते. कलम करण्याची योग्य पद्धत समजून घेऊया.. 

प्रत्यक्ष कलम करणेकलम करतेवेळी बागेतील तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस आणि ८० ते ९० टक्के आर्द्रता असे वातावरण गरजेचे असेल. या सोबत खुंटकाडी ही रसरशीत असणे व पाचर कलम करतेवेळी कलमजोड हा प्लॅस्टिकची पट्टीने व्यवस्थित बांधून घेणे गरजेचे असते. 

बऱ्याच ठिकाणी कलम करण्याच्या कालावधीत पावसाला खंड पडलेला असतो. अशा स्थितीत सायन काडीमध्ये रसनिर्मिती कमी होते. अशा परिस्थितीतील असलेल्या बागेत कलम करण्याच्या आधी तीन ते चार दिवस भरपूर पाणी द्यावे. त्याचा फायदा काडीमध्ये रसनिर्मितीला होतो. कलम केल्यानंतर बागेत उन्हे जास्त असल्यास सायन काडीच्या टोकावर मेण लावून घ्यावे. 

कलम केल्यानंतर साधारणतः १५ ते १६ दिवसांत सायनकाडीवरील डोळ्या फुटण्यास सुरुवात होते. त्यापूर्वी खुंटकाडीवरील सकर्स भरपूर प्रमाणात दिसून येतील. वेळीच सकर्स काढून घ्यावेत. अन्यथा, डोळे फुटणार नाहीत. डोळे लवकर फुटण्यासाठी बागायतदार हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग करतात. 

यामुळे काडी लवकर फुटून काही दिवसांतच ती फूट जळण्यास सुरुवात होते. परिणामी, कलम यशस्वी होणार नाही. त्यासाठी हायड्रोजन सायनामाइडचा वापर या बागेत टाळावा. त्यापेक्षा डोळा फुगलेल्या अवस्थेत जमिनीतून नत्राचा वापर फायद्याचा ठरेल.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :द्राक्षेपीक व्यवस्थापनशेती क्षेत्रशेती