Join us
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष काडीवर गाठी येण्याची कारणे, उपाय काय आहेत? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:47 IST

Grape Farming : पुढील शेंड्याकडील वाढ थांबल्यामुळे वेलीवर दाब निर्माण होतो. त्यामुळेच काडीवर गाठी आलेल्या दिसतील. 

Grape Farming :   बऱ्याच बागेत ओलांड्याचा पहिला टप्पा झाल्यानंतर दुसरा टप्पा तयार करण्यासाठी नत्रयुक्त खते, संजीवके, उपलब्ध टॉनिकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पुढील शेंड्याकडील वाढ थांबल्यामुळे वेलीवर दाब निर्माण होतो. त्यामुळेच काडीवर गाठी आलेल्या दिसतील. 

काडी काही ठिकाणी फुगलेली दिसते. फुगलेल्या भागात चिरा पडलेल्या दिसून येतील. काही स्थितीमध्ये त्या काडीवर मुळ्याही निघत असल्याचे दिसते. अशा जास्त परिणाम झालेल्या बागेत काडी त्याच ठिकाणी वाकेल किंवा मोडेल. 

अशा काड्यांमध्ये पोकळीही तयार होते. त्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा शेंड्याकडे होत नाही. काडी अशक्त राहून त्यामध्ये घड येणार नाही किंवा घडाचा विकास होणे शक्य नसते. काडी परिपक्व होण्यापूर्वीच्या कालावधीत बऱ्याच बागेत जमिनीवर तणनाशक वापरले जाते. 

वेलीला वळण व्यवस्थित दिलेले नसल्यास खाली वाकलेल्या फुटींनी तणनाशक शोषून घेतले तरी त्याचे परिणाम पुढील हंगामात छाटणीनंतर दिसून येतील.

उपाययोजना :

  • बागेत पाणी वाढवावे. 
  • शेंडा खुडणे बंद करून निघालेल्या बगलफुटी नवीन तीन ते चार पाने येईपर्यंत वाढू द्याव्यात.
  • पालाश व संजीवकांचा वापर टाळावा. 
  • जमिनीवर तणनाशकाची फवारणी करायचीच असेल, तर शक्यतो काडी परिपक्वतेच्या शेवटच्या टप्प्यात केलेली योग्य ठरेल.

 

 - ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :द्राक्षेपीक व्यवस्थापनशेती क्षेत्रशेती