Join us
Daily Top 2Weekly Top 5

गव्हात एकही उंदीर दिसणार नाही, फक्त हे तीन उपाय करा, बंदोबस्त झालाच म्हणून समजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 19:35 IST

Wheat Crop : गहू पिकातील उंदीर (Rodents in Wheat) ओंब्या येण्याच्या अवस्थेत ३ ते २१ टक्क्यांपर्यंत नुकसान करू शकतात.

Wheat Crop :  गहू पिकातील उंदीर (Rodents in Wheat) ओंब्या येण्याच्या अवस्थेत ३ ते २१ टक्क्यांपर्यंत नुकसान करू शकतात. उंदीर प्रामुख्याने पिकाच्या काढणीच्या काळात सर्वात जास्त नुकसान करतात, म्हणून वेळीच योग्य उपाययोजना करणे गरजेचे असते. 

गहू पिकातील उंदीर नियंत्रणाचे प्रभावी उपाय : 

  • बांधाची स्वच्छता : शेताचे बांध ३० सेंमी पेक्षा कमी रुंद ठेवावेत आणि बांधावरील उंच गवत काढून टाकावे जेणेकरून उंदरांना लपायला जागा मिळणार नाही.
  • पिंजऱ्यांचा वापर : उंदरांचे बिळे कमी असल्यास पिंजऱ्यात आमिष (उदा. भाजलेले अन्न) ठेवून त्यांना पकडणे हा सुरक्षित उपाय आहे. 
  • उंदराच्या नियंत्रणासाठी विषारी अमिषांचा वापर करावा. 
  • आमिष तयार करण्याकरिता कोणत्याही धान्याचा जाडाभरडा ५० भाग त्यात एक भाग झिंक फॉस्फाईड मिसळावे. 
  • यामध्ये थोडेसे गोडेतेल टाकून चांगल्या प्रकारे मिश्रण तयार करून प्रत्येक बिळामध्ये साधारणपणे एक चमचा मिश्रण काठीच्या सहाय्याने खोलवर टाकावे. 
  • बिळे पालापाचोळा वा गवत टाकून झाकून घ्यावीत व बिळांची तोंडे चिखलाने बंद करावीत.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Get Rid of Rats in Wheat Fields: Three Simple Solutions

Web Summary : Protect wheat crops from rodent damage with these three effective methods: maintain clean field boundaries, use traps, and strategically apply zinc phosphide-based poison bait in burrows. This will minimize losses during the harvest season.
टॅग्स :गहूरब्बी हंगामपीक व्यवस्थापनशेती क्षेत्र