Join us

Gahu Kadhani : गव्हाचे उत्पादन टिकवण्यासाठी काढणीवेळी हे सूत्र लक्षात ठेवा? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 15:24 IST

Gahu Kadhani : अशा परिस्थितीत गहू कधी काढायचा (Wheat Harvesting), कसा करायचा, हे प्रश्न शेतकऱ्यांना नक्कीच सतावत असतील. 

Gahu Kadhani : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून गव्हाची कापणी (Gahu Kadhani) जलद गतीने होणार असल्याने यावेळीही गव्हाला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. या वर्षी गव्हाची पेरणी ३२४.८८ लाख हेक्टर क्षेत्रात झाली आहे, तर गेल्या वर्षी ३१८.३३ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. यंदा गव्हाचे चांगले उत्पादन (Wheat Production) येण्याची आशा आहे. 

काही बाजार समित्यांमध्ये नवीन गव्हाची आवक देखील वाढली आहे. बरेच शेतकरी पीक पक्व होण्यापूर्वीच त्याची कापणी करतात, ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. दुसरीकडे, कापणीला उशीर झाल्यास, गव्हाचे दाणे शेतात पडू लागतात. अशा परिस्थितीत गहू कधी काढायचा (Gahu Kadhani), कसा करायचा, हे प्रश्न शेतकऱ्यांना नक्कीच सतावत असतील. 

गहू काढताना काळजी घ्या? गहू कापणीच्या वेळी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर गव्हाची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही वाढेल. गहू कापणीची वेळ, पिकाची आर्द्रता आणि कापणी तंत्र हे महत्त्वाचे घटक आहेत. कारण पीक पक्वतेच्या अवस्थेत असेल, अशावेळी काढणी केल्यास धान्याचे तुकडे जास्त होतात. वाळवण्याचा खर्च वाढतो आणि बुरशीजन्य रोगाचा धोका वाढतो. म्हणून, या तीन महत्त्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, कारण तज्ञांच्या मते, कापणी, मळणी आणि साठवणूक दरम्यान १७ टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

गहू कधी काढायचा?

  • पीक पिकल्यावर पाने सुकतात आणि गहू पिकाचा खालचा भाग सोनेरी होतो. दाणे कडक झाल्याचे जाणवते. 
  • याशिवाय, जर ओंबीमध्ये २५-३० टक्के ओलावा शिल्लक राहिल्यावर पीक काढता येते.
  • गहू पिकतो, जेव्हा २५ टक्के आर्द्रता असते आणि गहू पिकात ही स्थिती येते, तेव्हाच गव्हाची कापणी करावी. 
  • जर गहू कापणीला उशीर झाला तर २ ते ७ टक्के नुकसान होऊ शकते. 
  • गहू पिकाची कापणी करण्यापूर्वी सिंचन थांबवा. 
  • तसेच गव्हाच्या सर्व जातींची काढणी एप्रिलच्या अखेरीस करावी. 
  • जर तुम्ही विळा किंवा कापणी यंत्राने गहू कापला असेल, तर गव्हाचे पीक ४-५ दिवस शेतात सुकण्यासाठी सोडा. यानंतरच मळणी करा. 
टॅग्स :गहूकाढणीपीक व्यवस्थापनशेती क्षेत्रशेती