Farmer to Entrepreneur : भारतीय शेती क्षेत्र आज महत्त्वाच्या वळणावर उभे आहे. शेतीसमोरील आव्हानांची शर्यत तशीच असली, तरी शेतीत राबणारी तरुण पिढी यातूनही मार्ग काढताना दिसत आहे. (Farmer to Entrepreneur)
या तरुणांची पारंपरिक उपजीविकेच्या शेतीकडून बाजाराभिमुख, मूल्यवर्धित आणि उत्पन्नकेंद्रित शेतीकडे वाटचाल सुरू आहे. (Farmer to Entrepreneur)
बदलती ग्राहक मागणी, अन्नप्रक्रिया उद्योगाचा विस्तार, निर्यात संधी आणि शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) यांची वाढती भूमिका यामुळे हा कल अधिक बळकट होताना दिसत आहे. (Farmer to Entrepreneur)
उत्पादन पातळीवर बदल आजचा तरुण शेतकरी केवळ उत्पादन वाढीपुरता विचार न करता बाजारातील मागणी, दर्जा, एकसारखेपणा आणि वेळेवर उपलब्धता यावर भर देत आहे. (Farmer to Entrepreneur)
पिकांची निवड करताना बाजारभाव, करारशेती, प्रक्रिया उद्योगांची गरज आणि निर्यातयोग्य वाणांचा विचार केला जात आहे.
फळे, भाजीपाला, मसाले, फुले आणि विशेष पिकांमध्ये अनेक संधी आहेत. त्या दृष्टीने आधुनिक पद्धतीने पिके घेण्याकडे कल वाढला आहे.
आधुनिक तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन, सुधारित बियाणे आणि वैज्ञानिक व्यवस्थापनामुळे उत्पादनाबरोबरच गुणवत्ताही सुधारत आहे.
या संधींचा लाभ तरुण प्रयोगशील शेतकरी घेताना दिसत आहे. निर्यातशेतीच्या संधी जागतिक बाजारपेठेत भारतीय कृषी उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे.
द्राक्षे, डाळिंब, केळी, आंबा, भाजीपाला, सेंद्रिय उत्पादने आणि मसाले यांची निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, यासाठी गुणवत्ता, ट्रेसिबिलिटी, अन्नसुरक्षा मानके आणि प्रमाणपत्रे महत्त्वाची ठरतात.
निर्यातभिमुख शेतीमुळे शेतकऱ्यांना चांगले दर, दीर्घकालीन करार आणि स्थिर उत्पन्नाची संधी मिळते. 'एफपीओं'ची वाढती भूमिका शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ) या बाजाराभिमुख शेतीत परिवर्तन घडवून आणणारा महत्त्वाचा घटक ठरत आहेत.
एकत्रित उत्पादन, इनपुट खरेदी, प्रक्रिया, साठवण, थेट बाजार व निर्यात यामुळे शेतकऱ्यांची सौदाशक्ती वाढते. एफपीओमुळे लहान व अल्पभूधारक शेतकरीही मोठ्या बाजाराशी जोडले जात आहेत. थोडक्यात सांगायचे तर बाजाराभिमुख शेती ही काळाची गरज बनली आहे.
उत्पादन, प्रक्रिया, निर्यात आणि संघटन यांचा समन्वय साधल्यास शेती शाश्वत आणि फायदेशीर होऊ शकते.
शेतकरी 'उत्पादक' ते 'उद्योजक' या प्रवासात पुढे जात आहे, हीच भारतीय शेतीच्या भविष्याची दिशा आहे. स्थित्यंतर प्रक्रिया उद्योगाची भूमिका अन्नप्रक्रिया उद्योग हा बाजाराभिमुख शेतीचा कणा ठरत आहे.
कच्च्या मालाला मूल्यवर्धन करून अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना येथे उपलब्ध होते. कांदा, टोमॅटो, फळपल्प, भाजीपाला प्रक्रिया, दुग्ध व कुक्कुट प्रक्रिया यांसारख्या क्षेत्रांत मोठ्या संधी आहेत.
प्रक्रिया उद्योगामुळे मालाला स्थिर मागणी मिळते, दरातील चढ-उताराचा धोका कमी होतो आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होते. यात आव्हाने अधिक असले, तरी संधीही आहे. देशभरात अनेक कंपन्या प्रक्रिया उद्योगात आहेत.
बाजारात दर उतरल्यानंतर आता टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याऐवजी प्रक्रिया उद्योगाकडे देण्यात येत आहे. त्यातून टोमॅटो पिकाला बाजारभावाची स्थिरता मिळण्यास मोठी मदत होत आहे.
(- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्म्स)
हे ही वाचा सविस्तर : E Peek Pahani : शेतकऱ्यांनो, आजच करा ई-पीक पाहणी; अन्यथा मदत मिळणार नाही!
Web Summary : Indian agriculture shifts towards market-driven, value-added farming. Young farmers embrace modern tech, explore export opportunities, and leverage Farmer Producer Organizations (FPOs). Value addition through food processing offers stable demand and rural jobs, transforming farmers into entrepreneurs.
Web Summary : भारतीय कृषि बाजार-संचालित, मूल्य वर्धित खेती की ओर बढ़ रही है। युवा किसान आधुनिक तकनीक अपनाते हैं, निर्यात के अवसर तलाशते हैं, और किसान उत्पादक संगठनों (एफपीओ) का लाभ उठाते हैं। खाद्य प्रसंस्करण के माध्यम से मूल्यवर्धन स्थिर मांग और ग्रामीण नौकरियां प्रदान करता है, किसानों को उद्यमियों में बदलता है।