Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, एक एकर शेतात किती फळझाडे लावता येतील? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:10 IST

Horticulture : एका एकरामध्ये एकूण किती फळ झाडे लावता येतील, याचे गणित समजून घेऊयात...

Fal Bag Lagvad : अलीकडे शेतकरी फळबाग लागवड मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. मात्र अनेकदा योग्य व्यवस्थापन केल्याने जागेचा पुरेपूर वापर होत नसल्याचे पाहायला मिळतं. म्हणूनच फळबाग लागवडीसाठी जागेचा पुरेपूर वापर करण्यासाठी एका एकरामध्ये एकूण किती झाडे लावता येतील, याचे गणित समजून घेऊयात...

सुरवातीला जागेचा हिशोब पाहुयात.. एक एकर म्हणजे किती स्क्वेअर फुट? तर हे माप सगळे आपण फुटमध्ये पाहुयात. तर एक एकर म्हणजे ४३ हजार ५६० स्क्वेअर फुट हे लक्षात घ्या. जर अर्धा एकरामध्ये लावायचे असेल तर अर्ध क्षेत्रफळ किती तर २१ हजार ७८० चौरस फूट होय. 

आपल्याला किती फूट अंतरावर झाडे लावायचे आहेत, हे ठरवणं आवश्यक आहे. म्हणजेच दोन झाडांमधील अंतर किती असायला हवे, हे ठरवून घेणे. आपण जर ठरवलं की सहा फूट अंतरावर एक झाड लावूया. म्हणजेच एका झाडाला ०६ बाय ०६ फूट अशी जागा लागेल. म्हणजे ३६ स्क्वेअर फुट इतकी होय. म्हणजे झाडाची संख्या काढण्यासाठी शेतीचे क्षेत्रफळ भागिले, एका झाडाला लागणारे क्षेत्रफळ हा फॉर्मुला वापरावा लागेल. झाडांची संख्या शेतीचे क्षेत्रफळ भागिले एका झाडाला लागणारे क्षेत्रफळ..

आता थेट उदाहरणांसह समजून घेऊयात...जर झाडाची संख्या आपल्याला काढायची तर शेतीच्या क्षेत्रफळ ४३ हजार ५६० फूट भागिले एका झाडाला लागणारी जागा ६ बाय ६ म्हणजे ४६ स्क्वेअर फूट. म्हणजे एका एकराच क्षेत्रफळ भागिले ३६ म्हणजे एका झाडाला लागणारे क्षेत्रफळ, दोघांचा भागाकार केला तर उत्तर येते १२१० झाडे, म्हणजे एक एकरामध्ये जर ०६ फुटावर आपण एक झाड लावायचं ठरवलं तर १२१० झाडांची लागवड होईल. 

इतर काही उदाहरण पाहूयात जर ०६ फूट अंतरावर एक झाड लावले तर एक एकरामध्ये जवळपास १२१० झाडे, ०७ फूट अंतरावर झाडे लावल्यास ८८९ झाडे, ०८ फूट अंतरावर झाड लावल्यास ६८१ झाडे, ०९ फूट अंतरावर झाडे लावल्यास ५३८ झाडे, १० फूट अंतरावर एक झाड लावल्यास ४३६ झाडे आणि १० बाय १२ फूट अंतरावर एक झाड लावल्यास ३६३ झाडे लावता येतील. अशा पद्धतीने एका एकर मध्ये साधारण वरील प्रमाणे किंवा आपण ठरवलेल्या अंतरानुसार झाडे लागवड होऊ शकतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maximize Orchard Planting: Tree Count Guide for One Acre Farms

Web Summary : Optimize fruit orchard planting! Calculate tree count per acre based on spacing. A 6-foot spacing allows 1210 trees. Other spacing options also provided.
टॅग्स :फलोत्पादनफळेशेती क्षेत्रशेती