Join us

तुमच्या मोबाईलमधून ॲप वापरून अशी करा ई पीक पाहणी, सोप्या स्टेपद्वारे समजून घ्या! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:30 IST

E Pik Pahani App : या उपक्रमामुळे शेतकरी आता स्वतःच आपल्या स्मार्टफोनवरून पिकांचा पेरा, बांधावरील झाडे आणि क्षेत्राची नोंद करू शकणार आहेत. 

जळगाव : खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणीची (E Pik Pahani) प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करताना, अडचणी येतात. 'ई-पीक पाहणी' हे ॲप सुरू केले आहे. या उपक्रमामुळे शेतकरी आता स्वतःच आपल्या स्मार्टफोनवरून पिकांचा पेरा, बांधावरील झाडे आणि क्षेत्राची नोंद करू शकणार आहेत. 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तपणे डिजिटल क्रॉप सर्व्हे (Digital Crop Survay) हे ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे शेतकरी आपल्या शेतातील पिकांची, बांधावरील झाडांची आणि पडीक जमिनीची नोंदणी स्वतःच करू शकतात. यामुळे पिकांची अचूक माहिती शासनाकडे जमा होते.

असे वापरायचे ॲप

  • गुगल प्ले स्टोअरवरून 'ई-पीक पाहणी' ॲप डाउनलोड करा. 
  • नवीन वापरकर्त्यांनी आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर वापरून नोंदणी करावी. 
  • आपल्या सातबाऱ्यावरील शेतीचा गट क्रमांक निवडा. 
  • लागवड केलेल्या पिकाचा प्रकार निवडा. ॲपमधील कॅमेऱ्याने पिकाचा आणि क्षेत्राचा फोटो काढून अपलोड करा. 
  • सर्व माहिती भरल्यानंतर ती जतन करा. 
  • हा ई-पीक पाहणी प्रकल्प आता प्रायोगिक तत्त्वावर न राहता, संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात आला आहे. 
  • पिकांची अचूक नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी, शेतकऱ्याला पिकाचा फोटो शेताच्या ५० मीटरच्या आतूनच काढणे बंधनकारक आहे.

 

ई-पीक पाहणी ॲपमुळे शेतकऱ्यांचे जीवन खऱ्या अर्थाने सोपे झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे शासनाकडे पिकांची अचूक आणि अद्ययावत माहिती उपलब्ध होते, ज्यामुळे नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना वेळेवर मदत करणे शक्य होते. शेतकऱ्यांनी या ॲपचा जास्तीत जास्त वापर करावा आणि आधुनिक शेतीचा भाग बनावे.- कुर्बान तडवी, जिल्हा कृषी अधीक्षक

टॅग्स :पीक पाहणी शेती क्षेत्रकृषी योजनाशेती