Join us

Draksh Veli Sukane : द्राक्ष वेली अचानक सुकण्याची समस्या येत असेल काय कराल? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 19:20 IST

Grape Crop Management : बागेत वाढत्या तापमानात (Temperature) अचानक वाढवलेल्या पाण्यामुळे वेलीचे सोर्स : सिंक संबंध व संतुलन बिघडते.

Grape Crop Management : द्राक्ष  बागेत वाढत्या तापमानात (Temperature) अचानक वाढवलेल्या पाण्यामुळे वेलीचे सोर्स : सिंक संबंध व संतुलन बिघडते. पुरवठा, उपलब्धता आणि गरज या गोष्टींचा ताळमेळ बसत नसल्यामुळे फुटी सुकायला ( grape vines suddenly drying) सुरुवात होते. 

बागेत एका पट्ट्यातील वेली सलग सुकताना दिसत नाहीत. त्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी एक-दोन वेली सुकल्याप्रमाणे दिसतील. बागेमध्ये जमीनही एकसारखी नसेल.

तयार होत असलेल्या खोडाची साल काढल्यास त्यातून पाणी / चिकटद्रव्य निघताना दिसेल. प्रयोगशाळेत मुळांची तपासणी केली असता मुळांवर फ्युजॅरिअमचा प्रादुर्भाव दिसून येतो. 

द्राक्षवेल सुकताना दिसून येताच त्वरित खालील उपाययोजना कराव्यात.

उष्ण हवामानाचा अंदाज लक्षात घेता द्राक्ष बागेत अचानक फुटी सुकण्याची समस्या आढळून आल्यास बागेत नवीन फुटी निघत असताना एकतर शेडनेटचा वापर करून फुटी झाकून घ्याव्यात.

जवळपास सपकैन होईपर्यंत अधूनमधून पाण्याची फवारणी करत राहावी. यामुळे पानातील पेशींमध्ये योग्य रस टिकून राहण्यास मदत होईल. जमिनीमध्ये मुळांच्या कक्षेत वाफसा स्थिती राहील, अशाप्रकारे पाण्याचे नियोजन असावे. 

वाढत्या तापमानात सुरुवातीच्या काळात तीन ते चार पाने अवस्थेपासून वेलीला नत्र आणि पाणी पुरेसे मिळेल, याची काळजी घ्यावी. ज्या बागेत विरळणी होऊन फुटींचा जोम टिकून आहे, अशा ठिकाणी सपकैन करणे गरजेचे आहे.

  • (पावसाचा अंदाज लक्षात घेता स्वच्छ हवामान दरम्यानच सदरील कामे करावीत)

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी  

टॅग्स :द्राक्षेशेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापन