Join us
Daily Top 2Weekly Top 5

Grape Planting : द्राक्ष-लागवडपूर्व माती व पाणी परीक्षण करणे गरजेचे का असते, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 14:07 IST

Grape Cultivation : द्राक्ष लागवडीपूर्वी (किमान १ वर्ष आधी) माती व पाणी परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Grape Cultivation :   द्राक्ष लागवडीपूर्वी (किमान १ वर्ष आधी) माती व पाणी परीक्षण करणे दर्जेदार उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या जमिनीमध्ये द्राक्ष लागवड करणार आहोत, तेथील मातीमध्ये मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे नेमके प्रमाण किती आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे, सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ताही जाणून घेतली पाहिजे.

द्राक्ष - लागवडपूर्व माती व पाणी परीक्षण

  • बऱ्याच बागेमध्ये चुनखडीचे प्रमाण कमी अधिक आढळून येते. 
  • या चुनखडीच्या उपलब्धतेमुळे वेलीस अन्य अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यावर मर्यादा येतात किंवा खंडित होतो. 
  • परिणामी, वेलीचे उत्पादन कमी राहते. काही परिस्थितीमध्ये वेलीचे आयुष्यही कमी होते.
  • बऱ्याच ठिकाणी बोअरवेल व विहिरीचे पाणी सिंचनासाठी वापरले जाते. 
  • अशा पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. 
  • पाण्यातील अधिक क्षारांमुळे वेलीची शाकीय वाढ होत नाही, तर काही स्थितीमध्ये पानांवर स्कॉर्चिग येते. यामुळे उत्पादनामध्ये घट येते.
  • आपल्याकडे उपलब्ध असलेल्या स्थितीमध्ये योग्य खुंटाची निवड महत्त्वाची असते. 
  • याकरिता लागवडीपूर्वी माती व पाणी तपासून घेणे गरजेचे समजावे.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन सेवा केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :द्राक्षेपीक व्यवस्थापनशेतीशेती क्षेत्र