Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dodaka, Karle Lagvad : कमी खर्चात कमी कालावधीत चांगल उत्पादन देणारी दोडका, कारले शेती, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 18:05 IST

Dodaka, Karle Lagvad : दोडका आणि कारल्याची शेतीसाठी जमीन कशी असावी, वाण कोणते निवडावे हे समजून घेऊयात..

Dodaka, Karle Lagvad : दोडका आणि कारल्याची शेती फायदेशीर असून त्यासाठी योग्य जमीन, बियाणे प्रक्रिया, खत व्यवस्थापन आणि मंडप पद्धतीचा वापर आवश्यक आहे. योग्य अंतरावर बियाणे टाकून, बीजप्रक्रिया करून आणि संतुलित खतांचा वापर केल्यास चांगले उत्पादन मिळते. 

वेलवर्गीय भाजीपाला पिके : दोडका, कारले लागवड

  • चांगला निचरा होणाऱ्या, भुसभुशीत, मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. 
  • लागवडीपूर्वी शेताची चांगली मशागत करून एकरी ६ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. 
  • उन्हाळी लागवड जानेवारी ते मार्च महिन्यात करावी. 
  • लागवडीसाठी दोडक्याच्या पुसा नसदार, कोकण हरिता, फुले सुचिता; कारल्याच्या फुले प्रियांका, फुले ग्रीन गोल्ड, फुले उज्ज्वला, हिरकणी, कोकण तारा या सुधारित जातींची निवड करावी. 
  • तसेच बाजारामध्ये खाजगी कंपन्यांचे विविध उत्पादनक्षम वाण उपलब्ध आहेत. 
  • कारले आणि दोडका लागवडीसाठी ताटी पद्धतीचा अवलंब करावा. 
  • पारंपरिक पद्धतीपेक्षा या सुधारित पद्धतीमुळे उत्पादनात वाढ मिळते. लागवडीचे अंतर १.५ x १ मीटर ठेवावे. 
  • लागवडीसाठी दोडका, कारले या पिकाचे सुधारित वाणांचे ६०० ते ८०० ग्रॅम बियाणे लागते. 
  • पेरणीपूर्वी बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेडाझिम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. 
  • माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन सेवा केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Ridge Gourd, Bitter Gourd Farming: Low Cost, High Yield Tips

Web Summary : Profitable ridge gourd and bitter gourd farming requires well-drained soil, good seeds, fertilizer management, and the trellis method. Select improved varieties and treat seeds before planting. Soil testing is crucial for balanced fertilization, boosting overall production. Follow rural agricultural weather service guidelines for best results.
टॅग्स :शेती क्षेत्रपीक व्यवस्थापनरब्बी हंगामशेती