डाळिंब मृग बहार (बागेची अवस्था फळ वाढ आणि पक्वता) - बागेची मशागत
- फळबागेतून पाण्याचा संपूर्ण निचरा झालेला असावा.
- जास्त पावसामुळे झाडांच्या मुळांच्या जवळ पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी.
- फळांच्या योग्य वाढ व वजन मिळण्यासाठी गुच्छामधील जास्त आणि गरजेपेक्षा अधिक फळे काढावीत.
- फळांनी भरलेल्या फांद्यांना आधार देण्यासाठी योग्य स्टेकिंग किंवा आधार करावा.
- फळांच्या योग्य वाढ व वजन मिळण्यासाठी गच्छामधील जास्त आणि गरजेपेक्षा अधिक फळे काढावीत पाच वर्षांच्या झाडासाठी प्रति झाड सुमारे ८० ते १०० फळे घ्यावीत.
- जास्त आर्द्रतेमुळे फळे गळण्याची समस्या उद्भवू शकते.
- तसेच फळांची परिपक्वता आणि चांगला रंग येण्यास थोडा विलंब होऊ शकतो.
- लवकर मृग बहार घेतलेल्या बागेमध्ये फळ पूर्ण पक्व होऊन सालीचा व दाण्यांचा रंग विकसित झाला असल्यास, फळगळ आणि बुरशीचे डाग टाळण्यासाठी वेळेत फळ तोडणी करावी.
अन्नद्रव्य व्यवस्थापन०-५२-३४ (मोनो पोटॅशियम फॉस्फेट) ६ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे १५-२० दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या घ्याव्यात. मॅगनीज सल्फेटच्या ६ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे १०-१५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. प्रति एकरी ०-५२-३४ (मोनो पोटॅशियम फॉस्फेट) ५.१२ किलो, युरिया १२.५६ किलो आणि ०-०-५० (पोटॅशिअम सल्फेट) ४.६ किलो याप्रमाणे आठवड्याच्या अंतराने दहावेळा ड्रिपद्वारे द्यावे.
- ग्रामिण कृषि मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक.