Join us

PM Kisan Surrender : चुकूनही करू नका 'हे' काम, अन्यथा पीएम किसानचे पैसे विसरा, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:56 IST

PM Kisan Surrender : व्हॉलेंटरी सरेंडर फॉर पीएम किसान बेनिफिट्स अर्थात योजनेमधून बाहेर निघण्याचा मार्ग असा त्याचा अर्थ आहे.

PM Kisan Surrender : पीएम किसान योजनेमध्ये (PM Kisan Yojana) अनेक लाभार्थी पात्र असून यातील काही लाभार्थ्यांचे लाभ मिळणे बंद झाले आहे. याचे एक कारण म्हणजे Voluntary Surrender of PM-KISAN benefits हा पर्याय. काय आहे हा पर्याय, याचे तोटे काय आहेत? जाणून घेऊयात सविस्तर 

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर नव्याने Voluntary Surrender of PM-KISAN benefits हा पर्याय समाविष्ट करण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकून या पर्यायाचा वापर केल्याने लाभार्थी अपात्र होत आहेत. पुन्हा या योजनेच्या अंतर्गत अशा लाभार्थ्यांना नवीन अर्ज देखील करता येत नाही. त्यामुळे हा पर्याय शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरण्याची शक्यता आहे. 

पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर आल्यानंतर विंडोवर सर्वात शेवटी Voluntary Surrender of PM-KISAN benefits हा पर्याय आपण पाहू शकता. व्हॉलेंटरी सरेंडर फॉर पीएम किसान बेनिफिट्स अर्थात योजनेमधून बाहेर निघण्याचा मार्ग असा त्याचा अर्थ आहे. यात योजेनच्या माध्यमातून आपल्याला  दिलेला नोंदणी क्रमांक आणि आधार नंबरच्या साहाय्याने यातून बाहेर पडण्याचा हा पर्याय आहे. 

केंद्र शासनाच्या माध्यमातून (Central Government Scheme) ज्या काही योजना आहेत, सबसिडी असेल किंवा इतर केंद्र शासनाच्या योजना असतील, यामध्ये एखाद्या लाभार्थ्याला जर अशा शासकीय योजना लाभ नको असेल तर ते लाभार्थी योजनामधून बाहेर पडू शकतात. यासाठी हा पर्याय देण्यात आला आहे. सदर पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपली माहिती भरून ओटीपी एंटर केल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत येणारे लाभ बंद केल्या जात आहे. 

ही चूक करू नका, अन्यथा... 

  • आपण ही प्रक्रिया केली तर आपल्याला पुन्हा रजिस्ट्रेशन करता येणार नाही. 
  • पीएम किसान अंतर्गत येणारे सर्व हप्ते बंद होतील. 
  • या योजनेमधून आपल्याला लाभार्थी म्हणून अपात्र केले जाईल. 
  • त्यामुळे जर आपल्याला योजनेतून बाहेर पडायचं नसेल तर या पर्यायाचा वापर करण्याचा टाळा. 
टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेती क्षेत्रशेतीकेंद्र सरकार