Join us

डाळिंब बागेत अन्न द्रव्य व्यवस्थापन कसे करावे, कुठली खते द्यावीत, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:37 IST

Dalimb Bag : आणि एक महत्वाची गोष्ट, ज्यांच्याकडे पाणी मुबलक प्रमाणात आहे, त्यांनी तर आंबिया बहार अवश्य घेतला पाहिजे.

Dalimb Bag :    डाळिंब पिकात आंबिया बहार (Dalimb Ambiya Bahar) धरणे अधिक चांगले मानले जाते. कारण यामध्ये किड आणि रोगाचे प्रमाण कमी असते आणि एक महत्वाची गोष्ट, ज्यांच्याकडे पाणी मुबलक प्रमाणात आहे, त्यांनी तर आंबिया बहार अवश्य घेतला पाहिजे. या काळात अन्न द्रव्य व्यवस्थापन कसे करावे, हे समजून घेऊयात... 

सध्या डाळिंब बागेमध्ये फळे वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे फांद्यावर फळांचा भार आल्याने वाकलेल्या फांद्यांना आधार देणे गरजेचे आहे. त्यासाठी बांबूने ताणलेल्या तारेला सुतळीने बांधाव्यात किंवा परिस्थितीनुसार जी.आय. किंवा एम.एस. स्ट्रक्चरला बांधाव्यात.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

  • जिप्सम ६४० ग्रॅम आणि मॅग्नेशिअम सल्फेट ४०० ग्रॅम प्रति झाड जमिनीत पूर्णपणे मिसळून द्यावे. 
  • त्यानंतर पाणी द्यावे. 
  • सिंचनाद्वारे आठवड्याच्या दिवसांच्या अंतराने आठवेळा पुढीलप्रमाणे खते द्यावीत. 
  • (प्रमाण प्रति एकर प्रति वेळ) युरिया १६.५ ते २८ किलो ०-५२-३४ ९ किलो आणि ०-०-५० ९ किलो 
  • फवारणीद्वारे १० दिवसांच्या अंतराने पुढील खते द्यावीत. 
  • (प्रमाण प्रति लिटर पाणी) ०-५२-३४ ५ ते ६ ग्रॅम या प्रमाणे तीन फवारण्या आणि मँगेनीज सल्फेट ६ ग्रॅम या प्रमाणे दोन फवारण्या कराव्यात.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :डाळिंबशेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापन