Join us

डाळिंबाचे हस्त बहरात रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाय करावेत? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 15:22 IST

Agriculture News : डाळिंबाचे हस्त बहारातील व्यवस्थापन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Agriculture News :  डाळिंबाचे हस्त बहारातील व्यवस्थापन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात पाऊस, ऊन, धुके आदींचे वातावरण पाहायला मिळते. यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाय करावेत, हे समजून घेऊयात... 

डाळिंब हस्त बहार रोग व्यवस्थापन

  • पानगळीनंतर लगेच ताज्या तयार केलेल्या १ टक्का बोर्डो मिश्रणाची एक फवारणी करावी.
  • सॅलिसिलिक ॲसिड ०.३ ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाची २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फुलधारणेपूर्वीपासून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येकी चार फवारण्या कराव्या.
  • बोर्डो मिश्रण ०.५ टक्का किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रॉक्साइड (५३.८ डीएफ) १.५-२ ग्रॅम अधिक स्टीकर स्प्रेडर ०.५ मिली प्रति लिटर पाणीः या व्यतिरिक्त २-ब्रोमो, २-नायट्रोप्रोपेन-१, ३ डायोल (ब्रोनोपॉल ९५.८ डीएफ) ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे १० दिवसांच्या अंतराने फवारावे. जर बागेत आधीपासूनच तेलकट डागाचा प्रादुर्भाव असेल, तर कासुगामायसिन २ मिली प्रति लिटर पाणी हे
  • महिन्यातून एकदा आणि ७-१० दिवसांच्या अंतराने ब्रोनोपॉल फवारावे. 
  • गरजेपेक्षा अधिक फवारण्या टाळाव्यात. 
  • जर पाऊस झाला असेल, तर लगेचच कासुगामायसिन + कॉपरजन्य बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • बागेमधील बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावानुसार कॉपरजन्य बुरशीनाशके बदलून योग्य बुरशीनाशके वापरावीत.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Pomegranate: Control diseases in the Hast Bahar season with these measures.

Web Summary : Manage pomegranate crops carefully during Hast Bahar due to fluctuating weather. Use Bordeaux mixture after leaf fall. Spray salicylic acid and micronutrients before flowering. Apply copper-based fungicides and Bronopol, adjusting based on disease presence. Avoid excessive spraying and use appropriate fungicides after rain.
टॅग्स :डाळिंबपीक व्यवस्थापनशेती क्षेत्रशेती