Join us

Crop Disease Management : अतिवृष्टीनंतर पिकांवरील रोग व्यवस्थापन; वाचा प्रभावी उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:53 IST

Crop Disease Management : सततचा पाऊस आणि वाढलेली आर्द्रता कापूस, सोयाबीन, तूर व हळदीसह विविध पिकांमध्ये रोगांचा प्रसार वाढवतात. यावर तज्ज्ञांनी प्रतिबंधात्मक उपाय व रासायनिक व जैविक नियंत्रणाचे मार्गदर्शन दिले आहे. शेतकरी या मार्गदर्शनातून योग्य वेळी उपचार करून पिकांचे नुकसान टाळू शकतात. (Crop Disease Management)

Crop Disease Management : पावसाळ्यातील सततचा पाऊस, वाढलेली आर्द्रता आणि जमिनीत साचलेले पाणी पिकांसाठी गंभीर समस्या निर्माण करतात. विशेषतः कापूस, सोयाबीन, तूर व हळदीत विविध रोगांचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते.  (Crop Disease Management)

अशा परिस्थितीत योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्यास रोगांचा प्रसार रोखता येतो आणि उत्पादन व दर्जा टिकवता येतो. (Crop Disease Management)

कापूस मधील बोंडसड रोग व्यवस्थापन

आंतरबोंडसड (Internal boll rot): कॉपर ऑक्सिक्लोराइड ५०% – ५०० ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसीन ४० ग्रॅम प्रति एकर (२५ ग्रॅम + २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) मिसळून फवारणी करा.

बाह्यबोंडसड (External boll rot): पायराक्लोस्ट्रोबीन २०% – २०० ग्रॅम किंवा मेटीराम ५५%+पायराक्लोस्ट्रोबीन ५% –४०० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल २५% – २०० मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन १८.२%+डायफेनोकोनॅझोल ११.४% – २०० मिली किंवा प्रोपीनेब ७०% – ५००–६०० ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.

फवारणी १५ दिवसांच्या अंतराने पुन्हा करावी.

सोयाबीन मधील रोग व्यवस्थापन

रोग: शेंगा करपा, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, चारकोल रॉट आदी.

रासायनिक उपाय: टेब्युकोनॅझोल १०%+सल्फर ६५% – ५०० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल २५.९% – २५० मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन २०% – १५०–२०० ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन १३.३%+इपिक्साकोनाझोल ५% – ३०० मिली प्रति एकर फवारणी करावी.

जैविक उपाय: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मित बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा – ४ किलो प्रति एकर आळवणी करावी.

तुरीवरील फायटोप्थेरा रोग व्यवस्थापन

लक्षणे: खोडावर काळे डाग, खाचा पडणे, झाड वाळणे.

उपाय: मेटालॅक्झील एम ४%+मॅन्कोझेब ६४% – ५०० ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा – ५०० ग्रॅम प्रति एकर फवारणी व आळवणी.

टिप: रोग पाण्याच्या साचणाऱ्या परिस्थितीत अधिक पसरतो, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय जास्त महत्वाचे आहेत.

हळदीतील रोग व्यवस्थापन

पानावरील ठिपके व करपा: रोगग्रस्त पाने गोळा करून जाळून नष्ट करावीत, शेत स्वच्छ ठेवावे.

रासायनिक उपाय:

प्रादुर्भाव कमी असल्यास: कार्बेडेंझीम ५०% – ४०० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५% – ५०० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड ५०% – ५०० ग्रॅम प्रति एकर.

प्रादुर्भाव जास्त असल्यास: एजोक्सिस्ट्रॉबीन १८.२%+डायफेनोकोनाझोल ११.४% – २०० मिली किंवा प्रोपीकोनॅझोल २५% – २०० मिली किंवा क्लोरथॅलोनील ७५% – ५०० ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.

कंदकुज प्रतिबंध: ट्रायकोडर्मा – २–२.५ किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीत देणे.

कंदकुज झाल्यास: कार्बेडेंझीम ५०% – २०० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५% – ६०० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड ५०% – १००० ग्रॅम प्रति एकर मासिक फवारणी.

सर्व पिकांसाठी सामान्य काळजी

* पिकातील साचलेल्या पाण्याचा निचरा करणे अत्यंत आवश्यक.

* फवारणी करताना पावसाचा अंदाज घेऊनच काम करावे.

* बुरशीनाशके इतर कीटकनाशके किंवा खतांसोबत मिसळू नयेत.

* एकाच बुरशीनाशकाची सतत फवारणी टाळावी.

* फवारणीस स्वच्छ पाणी वापरावे.

* किडनाशके फवारणी करताना योग्य संरक्षक उपाय करावेत.

शेतकऱ्यांसाठी संदेश

अतिवृष्टीनंतर रोगांचा धोका जास्त असतो. वेळेवर योग्य रासायनिक व जैविक उपाय केल्यास पिकांचे नुकसान टाळता येते. शेतातील पाण्याचा निचरा करणे व साचलेल्या पाण्याची योग्य हाताळणी ही रोग प्रतिबंधाची प्राथमिक पायरी आहे.

(- डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत आणि श्री.एम.बी.मांडगे)

अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी संपर्क करा:कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी02452-229000व्हाट्सअ‍ॅप हेल्पलाइन – 8329432097

हे ही वाचा सविस्तर : Soil Health Management : डिजिटल मृदा नकाशा व एआयमुळे माती व्यवस्थापनात नवा अध्याय वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी विज्ञान केंद्रशेतकरीशेती